Diwali Faral Sakal
आरोग्य

आहार‘मूल्य’ : आहार आणि दिवाळी

दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर दिवाळीची चाहूल लागते. दिवाळी म्हणजे आनंदाला आलेलं उधाण. दिवाळीची सुटी, नातेवाईक, साफसफाई, खरेदी, पणत्या आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फराळ.

सकाळ वृत्तसेवा

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतर दिवाळीची चाहूल लागते. दिवाळी म्हणजे आनंदाला आलेलं उधाण. दिवाळीची सुटी, नातेवाईक, साफसफाई, खरेदी, पणत्या आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फराळ.

दिवाळीसाठी खास आहाराचे सल्ले

१) सकाळी लवकर उठून व्यायाम : आलेल्या नातेवाइकांबरोबर सकाळी फिरायला जाणं, टेकडीवर जाणं, सायकलिंग इत्यादीसारखे व्यायाम केल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होईल व शरीरामध्ये अतिरिक्त खाण्याने मेदनिर्मितीला आळा बसेल.

२) रात्रीच्या झोपेनंतर शरीराला इंधनाची गरज असते. अशा वेळेस प्रथिनयुक्त नाश्त्याच्या पदार्थाचं सेवन करावं. मोड आलेली कडधान्यं, डाळी, पनीर इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. त्याच वेळेस दिवाळीसाठी बनवलेले फराळाचे पदार्थ खावेत.

३) थंडीची सुरवात होत असल्यानं आहारातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे त्वचा कोरडी होते, थकवा येतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढवावं, त्याचबरोबर आहारात काढे, सूप, कढण इत्यादींचा समावेश करावा.

४) मिठाई बनवताना बनवताना अंजीर, सुकामेवा, खजूर, मनुका इत्यादींचा वापर करावा. पदार्थ तळण्याच्या ऐवजी भाजणं, उकळणं, वाफवणं इत्यादी प्रक्रियांचा वापर करावा.

५) सफाई करताना आणि खरेदी करताना उपासमार टाळावी. त्यावेळेस आहारात फळं, नारळपाणी, ताक इत्यादींचा समावेश करावा.

६) पदार्थ बनवताना मैद्याच्या ऐवजी वेगवेगळी पिठं उदाहरणार्थ नाचणी, सोयाबीन, मुगाच्या डाळीचं पीठ इत्यादींचा वापर करून शंकरपाळे, लाडू इत्यादी पदार्थ बनवावेत.

७) रात्रीच्या जागरणानं होणारी ॲसिडिटी टाळण्यासाठी सकाळची सुरवात कोमट पाणी आणि अर्धा चमचा गुलकंदानं (डायबेटिस असल्यास नाही) डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावी.

८) शेव/ चकली/ चिवडा इत्यादी पदार्थ प्रमाणात खावेत आणि त्याबरोबर पाण्याचं प्रमाण नीट राखावं- कारण या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण अतिरिक्त असतं.

९) आहारामध्ये विविध रंगाच्या भाज्यांचा आणि फळांचा समावेश करावा. फळं चावून खावीत, त्यांचे रस काढू नयेत.

१०) रात्रीचं जेवण हलकं घ्यावं. त्यामध्ये सूप, कढण, कढी आदींचा समावेश करावा. सर्वांनी आनंदानं, आरोग्यपूर्ण दिवाळीचा आनंद लुटावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT