Food Sakal
आरोग्य

आहार‘मूल्य’ : मेडिटेरियन आहार, निरोगी जीवनशैली

वेगवेगळ्या आहारपद्धतींमध्ये ‘मेडिटेरियन’ आहारपद्धती ही जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांवर अत्यंत प्रभावीपणे काम करू शकते.

सकाळ वृत्तसेवा

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

वेगवेगळ्या आहारपद्धतींमध्ये ‘मेडिटेरियन’ आहारपद्धती ही जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांवर अत्यंत प्रभावीपणे काम करू शकते. साधारणपणे बदललेल्या जीवनशैलीमध्ये या गोष्टी दिसून येतात :

  • प्रोसेस्ड फूडचा अतिरेक

  • अतिरिक्त मीठ व प्रिझर्व्हेट्सचा वापर

  • साखरयुक्त पदार्थ

  • सॅच्युरेटेड फॅट्सचा वापर

  • मटण किंवा रेड मीटचा वापर

  • मद्यपान व धूम्रपान

  • बैठी जीवनशैली

या सर्व गोष्टींमुळे या आजारांना निमंत्रण मिळते

  • रक्तदाब

  • मधुमेह

  • स्थूलत्व

  • हार्मोनल बदल

  • पीसीओस

  • सांध्याची दुखणी

या सर्व आजारांवर मेडिटेरियन जीवनशैली प्रभावशाली ठरते आहे. मुळात मेडिटेरियन आहाराचा गाभा हा पारंपरिक स्थानिक आहाराचा आहे. त्यामुळे ऋतूप्रमाणे आहार आणि स्थानिक फळे, भाज्या, डाळी, उसळी, मसाल्यांचा समावेश या दोन महत्त्वाच्या तत्त्वावर ही जीवनशैली आधारित आहे.

त्यामध्ये

  • आहारामध्ये विविध पालेभाज्या- उदाहरणार्थ, आंबटचुका, मेथी, करडई, माठ इत्यादींचा समावेश.

  • विविध रंगाच्या फळांबरोबर स्थानिक मिळणारी बोरं, करवंदं, जांभळं, फणस, ताडगोळे, अंजीर इत्यादींचा समावेश.

  • गहू, तांदूळ, मका यासारख्या धान्यांबरोबरच तृणधान्ये- उदाहरणार्थ, नाचणी, ज्वारी, वरई, राजगिरा इत्यादींचा समावेश.

  • पनीर, मासे, अंड्यातले पांढरे, मोड आलेली कडधान्ये इत्यादींचा समावेश.

  • वेगवेगळ्या तेलबिया, तीळ, जवस, कारळे इत्यादींचा समावेश.

  • अनसॅच्युरेटेड तेलाचा वापर- उदाहरणार्थ, सूर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा इ.

  • कमीत कमी मैदा, साखर, मीठयुक्त पदार्थांचा वापर.

  • भाज्या व फळांचे प्रमाण जास्त व व कर्बोदकांचे प्रमाण कमी.

  • चाळीस-पंचेचाळीस मिनिटे रोजचा व्यायाम

  • पुरेशी शांत झोप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT