How To Prevent Infertility sakal
आरोग्य

Infertility Prevention Tips: वंध्यत्व टाळण्यासाठी हवा समतोल आहार अन् व्यायाम

How To Prevent Infertility: वंध्यत्व टाळण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचा अवलंब करा.

सकाळ वृत्तसेवा

What Is Important To Prevent Infertility and Be Fertile: जीवनशैलीत मोठा बदल झाल्यामुळे वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अनियमित झोप, सततचा तणाव, अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव आणि बैठे जीवन याचा शरीरावरच नव्हे, तर प्रजनन क्षमतेवर अर्थात फर्टिलिटीवर परिणाम होत आहे.

वंधत्व टाळण्यासाठी वैद्यकीय उपचारासह समतोल आहार, व्यायाम आणि तणावमुक्त राहण्याची गरज आहे, असे मत वंध्यत्व निवारण तज्ज्ञांनी व्यक्त केले. सततच्या तणावामुळे महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन, अनियमित मासिक पाळीमध्ये अडथळा निर्माण होत आहे.

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे, गुणवत्ता घसरणे यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. धूम्रपान, मद्यपान, जंक फूडचे सेवन आणि स्थूलतेच्या समस्येमुळे ही स्थिती आणखी गंभीर बनत आहे.

या बदलत्या ट्रेंडवर प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वरिष्ठ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर म्हणतात, ‘‘आजच्या काळात वंध्यत्व ही केवळ वैद्यकीय समस्या न राहता, ती सामाजिक आणि मानसिक बाब बनली आहे. आमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या १० पैकी सात जोडप्यांमध्ये वंध्यत्वामागे थेट जीवनशैलीशी संबंधित कारणे दिसून येतात.’’

त्यांच्या मते, ‘‘वंध्यत्व टाळण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार पुरेसे नाहीत. त्यासोबतच समतोल आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्नही तेवढाच महत्त्वाचा आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?

मी अशा व्यक्तीबरोबर राहू शकत नाही... टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल ऋता दुर्गुळेने मांडलं मत; म्हणते, 'तो कितीही...'

Latest Marathi Breaking News : धक्कादायक! 16 वर्षीय भाचीला सख्या मामानं चालत्या लोकलमधून खाली ढकललं

SCROLL FOR NEXT