Balasaheb Thackeray google
आरोग्य

Balasaheb Thackeray : तब्बल १६ वर्षे बाळासाहेब या गंभीर आजारांशी लढत होते

दिवंगत हृदयरोग शल्यचिकित्सक नितू मांडके यांनी बाळासाहेबांवर उपचार करण्यासाठी अहमदाबादहून मुंबईत धाव घेतली होती.

नमिता धुरी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. त्याआधी १६ वर्षे बाळासाहेब विविध गंभीर आजारांशी लढा देत होते.

हृदयाशी संबंधित समस्या, पोटाच्या समस्या, COPD म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज असे अनेक गुंतागुंतीचे आजार त्यांना होते. हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार ?

१९९६ मध्ये त्यांना आरोग्याच्या पहिल्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. त्यांची पत्नी मीनाताई यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी बाळासाहेबांना छातीत वेदना सुरू झाल्या. यावेळी त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले.

दिवंगत हृदयरोग शल्यचिकित्सक नितू मांडके यांनी बाळासाहेबांवर उपचार करण्यासाठी अहमदाबादहून मुंबईत धाव घेतली होती.

डॉक्टरांना डाव्या बाजूला उतरत्या धमनीच्या अग्रभागी एक ब्लॉक आढळला होता. त्यामुळे बाळासाहेबांवर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली.

वर्षानुवर्षे, बाळासाहेब COPD आणि एम्फिसीमा आजारांनी ग्रस्त होते. या आजारात फुप्फुसांचे वायुमार्ग अरुंद होतात आणि हवेचा प्रवाह मर्यादित करतात.

परिणामी, श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यांना इस्केमिक हृदयरोग देखील होता आणि एकदा मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते.

त्यांची पचनक्रिया बिघडलेली होती. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी त्यांना दिवसातून दोनदा वाइन पिण्यास सांगण्यात आले होते.

वयोमानानुसार ठाकरे यांच्या आरोग्याच्या समस्या अधिकच गंभीर होत गेल्या. फेब्रुवारी २००९ मध्ये ताप आणि थकवा आल्याच्या तक्रारीनंतर त्यांना १४ दिवस लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जून २००९ मध्ये, त्यांच्या पक्षाच्या स्थापना दिवसाच्या एक दिवस आधी, त्यांना श्वासोच्छवास आणि छातीत धडधडणे अशा समस्या जाणवल्या होत्या.

त्यांची ऑक्सिजन पातळी घसरल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. स्थापना दिनाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.

पुढील महिन्यात, अँजिओग्राफीमध्ये अरुंद रक्तवाहिन्या आढळून आल्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

पुढच्या वर्षी, ज्या दरम्यान ८३ व्या वर्षी त्यांची तब्येत थोडी सुधारली होती. महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सभेला संबोधित केले होते.

त्यानंतर २०१२ साली पुन्हा प्रकृतीच्या काही तक्रारी सुरू झाल्या. वयोमानानुसार त्यांची प्रकृती ढासळत गेली व दिवाळीच्या दिवसांमध्ये त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT