Zika Virus Attack esakal
आरोग्य

Zika Virus : सावधान! डेंगीचाच डास झिका संसर्गाला कारणीभूत; गर्भवतीला संसर्ग झाल्यास बाळाच्या मेंदूवर परिणाम

पहिल्या तीन महिन्यात झिका विषाणूची लागण गर्भवतीला झाल्यास जन्माला येणाऱ्या बाळाच्या मेंदूचा विकास होत नाही

सकाळ ऑनलाईन टीम

Zika Virus : डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणारा ‘एडिस इजिप्ती'' डास ‘झिका'' विषाणूचा वाहक असून मुंबईला ‘झिका'' या विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. यामुळे झिकाची जोखीम वाढली आहे.

राजधानीप्रमाणे उपराजधानीलाही झिकाचा धोका आहे. लहान मुले, सामान्य व्यक्तींसह गर्भवती माता तसेच गर्भातील बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या तीन महिन्यात झिका विषाणूची लागण गर्भवतीला झाल्यास जन्माला येणाऱ्या बाळाच्या मेंदूचा विकास होत नाही. जन्मतः डोके आकाराने लहान असण्याची शक्यता असते, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

झिका विषाणूजन्य संसर्गासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांची स्वच्छ पाण्यात उत्पत्ती होते. स्थानिक आरोग्य संस्थांनी ‘एडिस इजिप्ती'' डास निर्मूलनाची विशेष शोध मोहीम घ्यावी. तसेच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावी. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या हृदयविकार, मधुमेह आणि यकृताचे आजार असलेल्या रुग्णांना संसर्गाचा धोका अधिक असतो. सोबतच वयोवृद्ध लोक, गर्भवती स्त्रिया व लहान मुलांना ''झिका'' व्हायरसचा संसर्ग अधिक होऊ शकतो.

झिका विषाणूची लागण झाल्यास ही लक्षणे दिसून येतात

व्यक्तीला ताप येणे

अंगावर चट्टेही उठतात

गर्भातील बाळाला धोका

डोकेदुखी

डोळे लाल होणे

उपाययोजना

भरपूर पाणी प्यावे

पुरेशी विश्रांती घ्यावी

डास असलेल्या परिसरात जाऊ नये

निर्जलीकरणाला दूर ठेवण्यासाठी द्रव पदार्थांचे सेवन करावे

ताप आल्यास पॅरासिटामॉल औषध वापरावे (Health)

झिका हा आजार किटकजन्य आहे. त्याचा प्रसार हवेमार्फत होत नाही मात्र डेंगीप्रमाणेच झिका संसर्गावर उपचार करणारी कोणतीही लस अथवा औषध सध्या अस्तित्वात नाही. विशिष्ट औषधोपचार प्रणाली विकसित नसल्याने प्रतिबंध हाच त्यावर सर्वोत्तम उपाय ठरतो. झिका विषाणूची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी दर सात दिवसांनी घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करावी. स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करावी. घरात एक दिवस ‘कोरडा दिवस'' पाळावा. ड्रम, टाक्‍या, शोभेचे कारंजे, मनी प्लांटमधील पाणी बदलावे.

- डॉ. चंद्रशेखर अतकर, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?

CM Interview : इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

IND vs ENG ODI: इंग्लंड वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? विराट कोहली तंदुरुस्त, पण हार्दिक अजूनही दुखापतीनं त्रस्त

MP Naresh Mhaske : नवी मुंबईत तर 'नाईक जनता पार्टी' चालते; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

डिझाइन, शाश्वतता आणि प्रवासी अनुभव... नवी मुंबई विमानतळाचा मोठा सन्मान! ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ यादीत समावेश

SCROLL FOR NEXT