Health  sakal
आरोग्य

Health Care News: सकाळी दात न घासता पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर आहे की हानिकारक, ते जाणून घेऊया.

Aishwarya Musale

शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे कोणापासून लपलेले नाही. पोटाच्या अनेक आजारांसाठी आणि स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या मते, दररोज 8-10 ग्लास पाणी प्यावे. पण बरेच लोक सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पितात. आज आपण हे जाणून घेणार आहोत की असे करणे खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का.

ब्रश करण्यापूर्वी पाणी पिण्याचे फायदे

डायजेशन चांगले होते

जर तुम्ही ब्रश करण्यापूर्वी पाणी पित असाल तर असे केल्याने तुमची पचनशक्ती चांगली राहते. तसेच तुमचे अन्न सहज पचते. शरीरात साचलेले अनेक आजार जसे आळस येणे, मुरुम येणे, पोटाचे आजार, अपचनाची समस्या, ब्रश न करता पाणी प्यायल्यास शरीरातील घाण निघून जाते.

सकाळी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे.

झोपेच्या वेळी म्हणजे 7-8 तासांच्या दरम्यान आपण पाणी पीत नाही. अशा स्थितीत तुम्ही सकाळी सर्वात आधी पाणी प्यावे जेणेकरुन तुमचे शरीर आधी हायड्रेटेड राहील.

इम्युनिटी वाढते

सकाळी दात न घासता पाणी प्यायलात तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासूनही तुमचा बचाव होतो.

विशेषत: हिवाळ्यात, जर तुम्हाला खोकला, सर्दी आणि हंगामी आजारांची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता. ब्रश न करता पाणी प्यायल्यास त्याचा त्वचेवर आणि केसांवर चांगला परिणाम होतो.

हाय ब्लडप्रेशर आणि हाय शुगर नियंत्रित करते

तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि साखर नेहमी नियंत्रणात राहते. तसेच कोमट पाणी प्यायल्यास रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात राहते. याशिवाय लठ्ठपणाची समस्याही दूर राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT