आरोग्य

Health : रिकाम्या पोटी खजूर खाण्याने खरचं फायदे होतात का? जाणून घ्या, खाण्याची योग्य वेळ

सकाळ डिजिटल टीम

निरोगी आणि आरोग्यदायी राहणे ही आजकाल प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. कारण तुम्ही निरोगी राहिला नाहीतर आजारी पडू शकता आणि आजारपण आरोग्यावर परिणाम करु शकते. त्यामुळे हल्ली लोक खाण्यापासून ते व्यायामापर्यंत शरीराची काळजी घेताना दिसतात म्हणजेच ते यासंदर्भात जागरुक झाले आहेत.

निरोगी राहण्यासाठी दिवसाची सुरुवात फ्रेश आणि चांगली होणे आवश्यक आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. जसे की सकाळी उठून गरम पाणी, जिऱ्याचा किंवा ओव्याचा चहा पिणे किंवा व्यायाम, योगा करणे. मात्र हे सर्व करत असताना आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे. त्याप्रमाणे त्याच्या गरजाही वेगळ्या आहेत. त्यामुळे आपली रोजची सकाळ कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो.

तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय खाता यावर तुमचा दिवसाचा फ्रेशनेस अवलंबून असतो. यासाठी आहारतज्ज्ञ सकाळी खजूर खाण्यास सल्ला देतात. कारण यामध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जे अल्झायमर, कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यास मदत करते आणि चयापचय क्रियाही सुधारते. काही लोक खजूर भिजवून तर काहीजण कच्चे खातात. परंतु रिकाम्या पोटी खजूर खाणे चांगले आहे का? हे आपण आज जाणून घेणार आहोत..

खजूर पोषक असतात

खजूरमध्ये लोह, फोलेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 चा चांगला गुणधर्म असतो. या व्यतिरिक्त, ते खूप चवदार असतात आणि बहुतेक लोकांना ते गोड चवीमुळे खायला आवडते.

खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती?

खजूरांमध्ये असलेले फ्रक्टोजमुळे रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास अस्वस्थता आणि पोट खराब होऊ शकते. तर जेवणानंतर खजूर खाणे त्रासदायक ठरू शकते. तुम्हाला जर पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही खजूर खाऊ शकता. खजूरमध्ये फायबरचे प्रमाण असते, ज्यामुळे तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटते. परंतु पचन प्रक्रियेला वेळ लागतो, त्यामुळे पोट गच्च राहते.

खजूर कसे खावे ?

मनुका प्रमाणे तुम्ही ताजे किंवा वाळलेले खजूर म्हणदेच खारीक खाऊ शकता. अनेकाना खजूर भिजवून खाणेही पसंद असते.

सकाळी खजूर का खावेत?

सकाळी खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी खजूर खाल्ल्याने आतड्यातील जंत नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय खजूर आवश्यक अवयवांची स्वच्छता करण्यासही मदत करतात. हे हृदय आणि यकृताचे आरोग्य सुधारते. याशिवाय खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला आणि केसांना नैसर्गिक चमक देतात. एका अहवालानुसार, खजूर खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT