Methi Hair Oil Benefits in Marathi Esakal
आरोग्य

Methi Hair Oil Benefits: दाट, चमकदार आणि मजबूत केस हवेत तर घरीच तयार करा हे औषधी तेल

मेथी हे केसांच्या सर्व समस्यांसाठी रामबाण समजले जाते. यासाठीच मेथीचं तेल केसांसाठी वापरल्यास अनेक समस्या दूर होवू शकतात

सकाळ डिजिटल टीम

Methi Hair Oil Benefits: अनेक गोष्टींचा आपल्या केसांवर परिणाम होत असतो. यात प्रदूषण, अयोग्य आहार, केसांची काळजी न  घेणे Hair Care तसचं आरोग्याच्या समस्या आणि केमिकलयुक्त शॅम्पू आणि तेल वापरणं यामुळे केसांच्या समस्या निर्माण होत आहेत.

यात केस गळणे Hair Fall, ते विरळ होणे तसचं अकाली केस पांढरे होणे या समस्या  निर्माण होत आहेत. काही वेळेस केसांची वाढ चांगली असली आणि ते दाट असले तरी पुरेसं पोषण न मिळाल्याने ते निस्तेज कोरडे Dry hair दिसतात. यासाठीच केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणं गरजेंचं आहे. Benefits of Fenugreek Methi Hair Oil for hair care

दाट, चमकदार आणि मजबूत केस प्रत्येकालाच हवे असतात. केसांच्या समस्या दूर होण्यासाठी अनेकजण काही ना काही प्रयत्नही करत असतात. मात्र अलिकडे केसांची काळजी घेण्यासाठी बाजारातील विविध प्रोडक्ट खरेदी केले जातात.

यातील बऱ्याच प्रोडक्टमध्ये केमिकलचा भडिमार केलेला असतो. यामुळे काही काळापुरते केस चांगले दिसत असले तरी कालांतराने त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

केसांना तेलने मालिश Hair massage करणं हे कधीही उत्तम. मात्र यासाठी बाजारातील केमिकलयुक्त तेलाचा वापर करण्यापेक्षा तुम्ही घरीच तयार केलेलं औषधी तेल वापरलं तर जास्त फायदा होईल. यासाठी घरीच तयार केलेलं मेथीचं तेल Fenugreek Oil हे केसांसाठी गुणकारी ठरू शकतं. Methi oil For Hair Growth

मेथी हे केसांच्या सर्व समस्यांसाठी रामबाण समजले जाते. यासाठीच मेथीचं तेल केसांसाठी वापरल्यास अनेक समस्या दूर होवू शकतात.

मेथीचं हे तेल तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकता. Homemade methi oil. मेथीचं तेल कसं तयार करावं ते कसं वापरावं आणि त्याचे फायदे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

असं बनवा मेथीचं तेल

साहित्य- अर्धी वाटी मेथी दाणे, नैसर्गिक किंवा घाण्याचे नारळाचे तेल Cold pressed coconut oil, ३-४ चमचे  एलोवेरा जेल, ५ चमचे काळे तीळ Onion seeds, १०-१२ कडीपत्ता, १०-१२ कडूनिंबाची पाने, १०-१२ तुळशीची पाने, ५-६ जास्वंदीची फुले, ३-४ लवंग आणि एक छोटा कांदा.

कृती-

 - मेथीचे तेल बनवण्यासाठी सर्वप्रमथ मेथी भिजत घालून नंतर ती कापडात बांधून तिला मोड आणावे. मोड आलेली मेथी हलक्या उन्हात चांगली वाळवून घ्यावी. त्यानंतर वाळलेली मोड आलेली मेथी आणि काळे तीळ यांची एकत्रित मिक्सरमध्ये पावडर करून घ्यावी. 

- एका मोठ्या भांड्यात शुद्ध नारळाच तेल coconut oil घ्यावं. यात मेथी आणि काळ्या तीळाची तयार पावडर आणि कांदा टाकून गरम होवू द्यावं.  त्यानंतर यात कडीपत्ता, तुळस आणि कडूनिंबाची पानं घालून २ मिनिटे शिजू द्यावं.

- त्यानंतर यात जास्वंदीची फुलं आणि एलोवेरा जेल मिस्क करावं आणि १५ मिनिटं हे तेलं उकळावं. त्यानंतर गॅस बंद करावा.

- तेल चांगलं गार होवू दयावं. त्यानंतर गाळून हवाबंद बाटलीत भरून ठेवावं.

हे देखिल वाचा-

मेथी तेलाचे फायदे

  • मेथी ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी- फंगल ही गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळेच स्कॅल्प इंफेक्शन होण्याचा धोका कमी होतो. तसचं या तेलामुळे केसांतील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होते.

  • मेथीच्या बियांमध्ये विटामिन ए, के आणि सीची मात्रा अधिक असते. तसचं फॉलिक असिड, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयरन असतं. मेथीमध्ये उपलब्ध असलेल्या निकोटिनिक एसिडचे घटक आणि प्रोटीनमुळे केस गळती कमी होते. तसचं कोंडाही दूर होतो. Dandruff Solution  

  • मेथीच्या तेलामध्ये वापरण्यात आलेल्या काळ्या तीळामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल. या शिवाय केसांच्या वाढीसही काळ्या तीळातील गुणधर्म उपयुक्त ठरतात. Black seeds benefits.

  • तर तेलामध्ये वापरण्यात आलेल्या कडीपत्त्यामुळे केसांचा रंग टिकून राहण्यास मदत होते. तसचं कडीपत्त्यामधील प्रोटीन आणि बीटा कॅरेटीनमुळे Beta carotene केस गळती थांबवते तसचं केस पातळ होत नाहीत.

  • मेथीचं तेल केसाला लावल्याने केस मुळापासून मजबूत होतात. त्यामुळे केस गळणे कमी होते. या तेलाचा नियमित वापर केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते शिवाय केस दाट आणि सॉफ्ट होण्यास मदत होते. soft hair

  • मेथीच्या बियांमध्ये लेसिथिनचं मुबलक प्रमाणात आढळत यामुळे केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होते. Natural Remedy for Hair loss

आंघोळ करण्यापूर्वी २ तास आधी मेथी तेलाने केसांना चांगलं मालिश करावं. तेलाने केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करावं. त्यानंतर हर्बल किंवा एखाद्या माईल्ड शॅम्पूने केस धुवावे.

आठवड्यातून किमान तीनदा या होममेड मेथीच्या तेलाने केसांना मालिश केल्यास केसांना आवश्यक असलेली पोषक तत्व मिळतील. यामुळे केस मजबूत, चमकदार आणि दाट होतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT