Women Health esakal
आरोग्य

Women Health : महिलांनी या पद्धतीने पुदिन्याचे सेवन केल्यास हॉर्मोनल अंसतुलनाची समस्या होईल दूर

आज आपण हार्मोनल असंतुलनाच्या समस्येत पुदिन्याचे कसे सेवन करावे ते सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Women Health : पुदिन्याच्या पानांनी जेवणाला चांगला सुगंध आणि स्वाद येतो. याचा फक्त एवढाच उपयोग नसून पुदिन्याचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. मात्र महिलांच्या अनेक समस्यासुद्धा पुदिन्याने दूर होतात. हल्ली महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाच्या समस्या वाढत चालल्या आहेत.

वेळेत मासिक पाळी न येणे, पाळीत फार वेदना होणे, पीसीओस, थायरॉइड यांसारख्या समस्या उद्भवणे अशा बऱ्याच समस्यांचा सामना महिलांना करावा लागतो. अशात एक्सपर्टने पुदिना महिलांच्या डाएटमध्ये अॅड करण्याचा सल्ला महिलांना दिलाय. आज आपण हार्मोनल असंतुलनाच्या समस्येत पुदिन्याचे कसे सेवन करावे ते सविस्तर जाणून घेऊया.

हार्मोनल अंसतुलनाच्या समस्येत पुदिन्याचे फायदे

पुदिन्यात अँटी-एन्ड्रोजनचा प्रभाव असतो. याचे सेवन केल्याने महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होऊ शकतो. तसेच पुदिन्याचे सेवन केल्याने शरीरात वाढलेला एन्ड्रोजेनचा स्तरही कमी करण्यात मदत होते. त्यामुळे पीसीओसमध्ये महिलांना चेहऱ्यावर येणाऱ्या अनवाँटेड हेअर्सची समस्या दूर होते. याशिवाय पुदिन्याच्या सेवनाने हार्मोनल असंतुलनामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स दूर होतात.

पुदिन्याच्या सेवनाने महिलांमध्ये एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोनचे संतुलन व्यवस्थित ठेवण्यास मदत होते. हे दोन्ही हार्नोन्स तुमची मेंस्ट्रुअल सायकल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि लवकर राग येणे यांसारखी लक्षणं हार्मोनल असंतुलनामुळे दिसून येतात. महिलांनी पुदिन्याचे सेवन रोज केल्यास स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचा स्तर कमी करण्यास मदत होते. तुमचा मूड सुधारण्यासही याची मदत होईल. (Mint leaves)

हार्मोन्स बॅलेंस ठेवण्यासाठी या पद्धतीने करा पुदिन्याचे सेवन

महिला सकाळी रिकाम्या पोटी पुदिना पाण्यात उकळून सेवन करू शकतात. याशिवाय तुम्ही पुदिन्याची हर्बल टी बनवूनही पिऊ शकता. पुदिन्याचा तुमच्य रोजच्या जेवणात अनेक गोष्टींमध्ये समावेश करून घ्या. तुम्ही पुदिन्याची चटणी बनवून खाऊ शकता. पुदिन्याची कोशिंबीरसुद्धा स्वादिष्ट लागते. (Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

SCROLL FOR NEXT