Benefits of Naukasana esakal
आरोग्य

Benefits of Naukasana : वजन कमी करण्यासाठी आणि उत्तम पचनक्षमतेसाठी नौकासन फायदेशीर, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Benefits of Naukasana : विविध योगासनांपैकीच एक असलेले नौकासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Naukasana : निरोगी आरोग्यासाठी रोजचा संतुलित आहार आणि शारिरीक हालचाल आवश्यक आहे. शारिरीक हालचालीमध्ये तुम्ही नियमित योगा करू शकता, व्यायाम करू शकता किंवा वर्कआऊट करू शकता. परंतु, मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगा फायदेशीर आहे. नियमितपणे योगासने केल्याने आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश होतो. या योगासनांपैकीच एक असलेले नौकासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या योगासनाचा सराव करताना आपले शरीर बोटीसारखा आकार घेते. या आसनाचा नियमितपणे सराव केल्याने संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते आणि पचनक्रिया चांगली राहते. आज आपण हे नौकासन करण्याची पद्धत आणि आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

नौकासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • नौकासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा आणि तुमचे दोन्ही पाय एकत्र ठेवा.

  • आता तुमचे दोन्ही हात शरीराजवळ ठेवून दीर्घश्वास घ्या.

  • त्यानंतर, श्वास सोडताना छाती आणि तुमचे दोन्ही पाय जमिनीपासून वर उचला.

  • आता तुमचे दोन्ही हात पायांच्या दिशेने खेचा.

  • या स्थितीमध्ये तुमच्या हातांची आणि पायांची बोटे तसेच डोळे हे एका रेषेत असायला हवीत.

  • आता तुम्हाला शरीरात ताण जाणवेल.

  • काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर तुम्ही पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

  • हे योगासन जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर योगातज्ज्ञाची मदत अवश्य घ्या.

नौकासनाचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे :

  • नौकासनाचा नियमित सराव केल्याने पचनक्षमता सुधारते.

  • या आसनाचा सराव केल्याने पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

  • दररोज हे योगासन केल्याने पायाचे आणि हातांचे स्नायू टोन होतात.

  • विशेष म्हणजे हर्नियाची समस्या असलेल्या लोकांसाठी हे योगासन फायदेशीर असल्याचे मानले जाते.

  • नौकासनाचा नियमितपणे सराव केल्याने वजन कमी करण्यास आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

  • नियमितपणे या आसनाचा सराव केल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

  • यकृत, स्वादुपिंड आणि फुफ्फुस मजबूत करण्यासाठी नौकासनाचा सराव करणे फायदेशीर ठरू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel News: पनवेलच्या कळंबोली गेट पंप प्रकल्पावरून नवा वाद, ठाकरे गटाच्या नगरसेविका आक्रमक

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

SCROLL FOR NEXT