Benefits Of Uttanasana esakal
आरोग्य

Benefits Of Uttanasana : झोपेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर उत्तानासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Benefits Of Uttanasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आजकाल अनेक जण योगाचा अवलंब करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Uttanasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आजकाल अनेक जण योगाचा अवलंब करतात. योगासनांमध्ये विविध आसनांचा समावेश आहे. या आसनांपैकीच एक असलेले आसन म्हणजे उत्तानासन होय. हे योगासन नियमित केल्याने शरीराला चांगला ताणा मिळतो आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते.

या आसनाला इंग्रजीत फॉरवर्ड बेंड पोझ किंवा इंटेन्स स्ट्रेज पोझ असे ही म्हटले जाते. या आसनाचा सराव केल्याने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. आज आपण आरोग्यासाठी फायदेशीर असणारे हे उत्तानासन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.

उत्तानासन करण्याची योग्य पद्धत

  • उत्तानासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा आणि तुमचे दोन्ही हात नितंबांवर ठेवा.

  • आता श्वास घेताना तुमची कंबर पुढच्या बाजूला वाकवा.

  • त्यानंतर, घोट्याला हाताने मागे धरा आणि तुमचे दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवा.

  • या दरम्यान तुमची छाती पायाच्या गुडघ्यांना स्पर्श करेल.

  • आता तुमचे पाय ताठ ठेवा आणि दोन्ही पायांच्या टाचांवर शरीर स्थिर ठेवा.

  • आता तुमचे डोके खाली झुकवा आणि दोन्ही पायांच्या मधोमध पाहा.

  • काही सेकंद या स्थितीमध्ये राहा. तुम्हाला या दरम्यान शरीरात ताण जाणवेल.

  • त्यानंतर, हळूहळू सामान्य स्थितीमध्ये या.

उत्तानासन योगासन करण्याचे आरोग्यदायी फायदे

  • उत्तानास हे योगासन नियमितपणे केल्याने मांड्या, पाठ, कंबर आणि नितंबातील स्नायू मजबूत होतात. यामुळे, स्नायूंची दुखापत कमी होते आणि इतर समस्या कमी होऊ शकतात.

  • दररोज हा सराव केल्याने मेंदू मजबूत होतो. मन शांत राहते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.

  • उत्तानासन हे योगासन केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

  • या योगासनाचा दररोज सराव केल्याने डोकेदुखी आणि निद्रानाशाच्या समस्येपासून ही आराम मिळतो. झोप चांगली लागते.

  • दररोज हे योगासन केल्याने पचनसंस्थेच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि शरीर टोन होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: १० दिवसांत आरोपपत्र, १६ तारखांत सुनावणी पूर्ण; अवघ्या ५८ दिवसांत अत्याच्यार पीडितेला न्याय, पोलिसांचे कौतुक

"त्यावेळी मी त्यांच्या कानाखाली मारू शकले असते पण.." मराठी अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

Minister Nitin Gadkari: पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना विसरू नका: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र

Kolhapur RTO Scam : कोल्हापूर आरटीओमध्ये गैरप्रकार, ९०० नंबरसाठी सीरियल फोडली; झारीतील शुक्राचार्य कोण?

Raigad News:'विधायक व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर'; गणरायासमोर जागतिक वारसा मिळालेल्या बारा किल्ल्यांचा देखाव्यातून गडसंवर्धनाचा संदेश

SCROLL FOR NEXT