Zumba For Fitness esakal
आरोग्य

Zumba For Fitness : तंदूरुस्त शरीरासाठी रोज करा झुम्बा, नैराश्यासह ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम

Zumba For Fitness : झुम्बा डान्सच्या माध्यमातून वर्कआऊट करण्याचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Zumba For Fitness : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे अतिशय गरजेचे आहे. आजकाल अनेक जण तंदूरूस्त राहण्यासाठी वर्कआऊट, व्यायाम, योगा आणि झुम्बाची मदत घेतात. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी झुम्बा डान्स फायदेशीर आहे. झुम्बा डान्सच्या माध्यमातून वर्कआऊट करण्याचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

झुम्बा डान्स नियमित केल्याने उत्तम फिटनेस राखण्यात मदत होते. या वर्कआऊटद्वारे तुम्ही तुमचे शरीर लवचिक बनवू शकता तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करू शकता. जिममध्ये केल्या जाणाऱ्या वर्कआऊटच्या तुलनेत झुम्बा डान्स अतिशय फायदेशीर मानला जातो. झुम्बा डान्समध्ये सालसा, हिपहॉप आणि बेली डान्स इत्यादी अनेक प्रकारच्या नृत्यशैलींच्या स्टेप्सचा समावेश असतो. आज आपण झुम्बा केल्याने आरोग्याला होणारे फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.

ताण-तणाव कमी होतो

नियमितपणे झुम्बा डान्स केल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. रोज झुम्बा डान्स केल्याने शरीरातील सेरोटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढते. हा एक प्रकारचा आनंदी संप्रेरक आहे, जो आपला मूड नियंत्रित ठेवण्याचे काम करते.  झुम्बा केल्याने हा आनंदी संप्रेरक बाहेर पडतो ज्यामुळे, मूड सुधारतो आणि ताण-तणाव, नैराश्य दूर होते.

शरीराला मिळते भरपूर ऊर्जा

दररोज झुम्बा डान्सचा सराव केल्याने आपल्या शरीराची हालचाल चांगली होते. ज्यामुळे, शरीरातील स्नायूंमध्ये रक्ताभिसरणाची प्रक्रिया चांगली होते. यामुळे, आपले शरीर मजबूत होण्यास मदत होते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. झुम्बा केल्याने शरीर सक्रिय राहते आणि हातपायांचे स्नायू मजबूत होतात.

वजन कमी होते

नियमितपणे झुम्बा डान्सचा सराव केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. तसेच, झुम्बा डान्स करताना आपले शरीर सक्रिय होते. त्यामुळे, शरीरातील अतिरिक्त चरबी वितळू लागते. वजन कमी करण्यासाठी झुम्बा फायदेशीर असला तरी याचा नियमित सराव करणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: सून सासरच्यांचा सांभाळ करण्यास बांधील नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वारसा हक्क आणि पोटगी वेगवेगळे

Pune Rain Update : पुण्यात अवकाळीची एन्ट्री; बाणेरमध्ये गारांचा पाऊस, उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा

Latest Marathi News Live Update : भारत सरकारकडे पुरेसा गॅस, इंधनसाठा उपलब्ध : छगन भुजबळ

Political Statement : नशेखोरांविरोधात रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा इशारा

Ajinkya Rahane: KKR चे 25 कोटी पाण्यात ग्रीनच्या 'नो बॉलिंग'ने कोलकात्याचं गणित बिघडलं; रहाणेंचं उत्तर ऐकून चाहते थक्क!

SCROLL FOR NEXT