Yoga Tips  esakal
आरोग्य

Yoga Tips : उत्तम टोनिंगसाठी अन् वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Yoga Tips : नियमित योगासनांचा सराव केल्याने आणि संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga Tips : नियमित योगासनांचा सराव केल्याने आणि त्याच्या जोडीला संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. परंतु, आजकाल बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. या समस्यांमध्ये लठ्ठपणाचा ही समावेश आहे. मग, हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात.

वजन वाढल्यामुळे याचा थेट परिणाम तुमच्या कंबर आणि पोटावर दिसू लागतो. वजन वाढल्यामुळे, पोटावरील आणि कंबरेवरील चरबी अधिक प्रमाणात वाढू लागते. ही चरबी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता.

या योगासनांचा नियमित सराव केल्याने तुम्हाला काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल. तुमचे वजन कमी होऊ शकेल आणि पोट, कंबरेवरील चरबी कमी होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांबद्दल

चक्रासन

चक्रासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. चक्रासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा. त्यानंतर, दोन्ही हात आणि पाय एका सरळ रेषेत ठेवा. त्यानंतर, तुमचे गुडघे वाकवून दोन्ही हात मागच्या दिशेने न्या.

आता तुमच्या दोन्ही पायांवर संपूर्ण शरीराचा भार टाकून नितंब वर उचला. त्यानंतर, तुमचे वजन दोन्ही हातांवर ठेवा आणि खांदे वरच्या दिशेने न्या. आता या स्थितीमध्ये जमिनीवरून शरीर उचलताना तुमचे हात आणि पाय सरळ ठेवा. या स्थितीमध्ये तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. काही सेकंद असेच थांबा त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

मलासन

मलासन हे योगासन महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते. खास करून मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. नियमित या योगासनाचा सराव केल्याने शरीरावरील चरबी विरघळण्यास मदत होते.

मलासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ रेषेत उभे राहा. त्यानंतर, पाठीचा कणा ताठ ठेवून पोट आत न्या. आता तुमचे दोन्ही खांदे ओढताना दीर्घ श्वास घ्या. नमस्काराच्या मुद्रेत हात जोडा. त्यानंतर, श्वास सोडा आणि दोन्ही गुडघ्यांवर बसा. या स्थितीमध्ये तुमच्या शरीराचा भार गुडघ्यांवर असेल. काही सेकंद या स्थितीमध्ये राहिल्यानंतर, तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. त्यानंतर, सामान्य स्थितीमध्ये या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CET Percentile Scam : महाराष्ट्रात CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा घोटाळा?; चौकशी होण्याची शक्यता

Pimpri Rain: मुसळधार पावसाने पवना धरण ९६ टक्क्यांवर; आंद्रा शंभर टक्के भरले, पिंपरी परिसरात मुसळधार, तीन गावांचा संपर्क तुटला

Latest Live Updates Marathi : : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस रस्त्यावरून थेट घरावर कोसळली; ३९ जण जखमी

Kalsubai Harishchandragad Sanctuary : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! भंडारदरा, कळसूबाई अन् हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्यांचा प्लॅन फसणार; 'या' कारणामुळे ट्रेकिंगवर बंदी

Shooting World Cup: भारताच्या ईशा सिंगची सुवर्णपदकावर मोहर, तर मनू भाकरला ब्राँझपदक

SCROLL FOR NEXT