Blood Cloting Signs esakal
आरोग्य

Blood Clotting Signs: शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे गंभीर! शरीरातील हे बदल ठरतात धोक्याची घंटा...

कोरोना काळानंतर झालेल्या सर्वेक्षणात जे रूग्ण व्हायरससशी संक्रमित होते त्यांच्यामध्ये जवळपास एका वर्षानंतर रक्ताच्या गुठळ्या झालेल्या दिसून आल्या

सकाळ ऑनलाईन टीम

Health Care: शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे फार गंभीर प्रकार ठरू शकते. त्यालाच आपण ब्लड क्लॉटींग असेही म्हणतो. ब्लड क्लॉट हे अनेक पद्धतीचे असतात. अधिकतर ब्लड क्लॉट हे पायाच्या खालील बाजूस होताना दिसतात. शिवाय तुमचं हृदय, फुफ्फुस, मेंदू आणि पोटाच्या भागांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

ब्लड क्लॉटींग हा कोरोनाच्या दुष्परिणांमधला एक परिणाम आहे. कोरोना काळानंतर झालेल्या सर्वेक्षणात जे रूग्ण व्हायरससशी संक्रमित होते त्यांच्यामध्ये जवळपास एका वर्षानंतर रक्ताच्या गुठळ्या झालेल्या दिसून आल्या. याच कारणाने रूग्णांमध्ये इतर आजारांचाही धोका दिसून आला. (Dangerous Symptoms)

रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या काळात तुमच्या शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. तेव्हा या लक्षणांकडे जर तुम्ही दूर्लक्ष केले तर हा धोका आणखी वाढण्याची शक्यता असते. तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधल्यास तुमच्यावर योग्य तो उपचार होण्यास मदत होईल.

रक्ताच्या गुठळ्या होण्याची ही प्रमुख लक्षणे आहेत

१. त्वचेचा रंग बदलणे

रक्ताच्या गुठळ्या झाल्याने हाता पायाच्या नसा बंद होऊ तुमच्या त्वचेचा रंह बदलायला लागतो.

२. सूज येणे

रक्ताची गुठळी तुमच्या रक्तप्रवाहात अडथळा आणते. त्यामुळे रक्त जमा होऊन पेशींना सूज येण्याची शक्यता असते. रक्ताची गुठळी तुमच्या हातात किंवा पोटातही तयार होऊ शकते. अशा परिस्थितीत ३ पैकी एका व्यक्तीला शरीरात विविध जागी सूज येण्याच्या तक्रारी असतात.

३. छातीती दुखणे

तुमच्या वेदना होत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात तयार झालेली रक्ताची गुठळी फुटली आहे. अशा वेळी हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

४. श्वास घेण्यास त्रास होणे

जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर फुफ्फुसात किंवा हृदयात रक्ताची गुठली झाल्याचं ते लक्षण असू शकतं. त्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात. तुम्ही बेशुद्ध देखील होऊ शकता. हे लक्षण फार गंभीर असतं.

५. सतत खोकला येणं

सतत खोकला येण हे देखील शरीरात रक्ताची गुठळी असल्याचं लक्षण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या छातीत दुखापत असेल किंवा खोकल्यातून रक्त येत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT