Boiled Bay Leaf Benefits esakal
आरोग्य

Boiled Bay Leaf Benefits: जेवणाला चव देणारं तेजपान पाण्यात मिसळून प्या; फायदे वाचून अवाक व्हाल

तुमचं आरोग्य जपण्यासाठी ते तुम्हाला मदत करतं. यात अनेक प्रकारचे विटामिन असतात

साक्षी राऊत

Morning Health Tips: जेवणात जवळपास प्रत्येकाच्याच घरी मसाले वापरले जातात. मसाले पदार्थांच्या यादीत एक महत्वाचा पदार्थ म्हणजे तेजपान. जेवणाला चविष्ट बनवणारं तेजपान पाण्यात उकळून पिण्याचे फायदे मात्र तुम्हाला माहितीये काय? तेजपान उकळून पिण्याचे फायदे वाचून तुम्हीही अवाक व्हाल. जाणून घ्या कसे.

आरोग्यासाठी तेजपान वरदान मानल्या जातं. एक्सपर्टच्या मते, तेजपान पाण्यात उकळून पिल्याचे भन्नाट फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया तेज पानाचे नेमके कोणते फायदे तुम्हाला होऊ शकतात.

तेजपानाचे फायदे

तेजपानात महत्वाचे पोषक घटक आहे. तुमचं आरोग्य जपण्यासाठी ते तुम्हाला मदत करतं. यात अनेक प्रकारचे विटामिन असतात. उदा. ए, बी, सी, ई, आयरन, कॅल्शियम, मँगनिज असतं. अनेक प्रकारचे औषधी गुणही यात दिसून येतात. तेजपान मनुष्याच्या शरीरातील पोषक तत्वांची कमी पूर्ण करतो. (Health Tips)

तेजपान पाण्यात उकळून पिण्याचे फायदे

कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते

पचनशक्ती वाढवते आणि मेटाबोलिझम पावर वाढवत एक्स्ट्रा कॅलरी कमी करतं.

तेजपानाचं उकळलेलं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

लो आणि हाय ब्लड शुगर दोन्ही परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी तेज पत्ता लाभदायक ठरतो.

हे किडनीतील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. किडनीला फिल्टर करत कार्यक्षमतेत सुधारणा करते.

तेजपानाचं पाणी प्यायल्याने झोप न येणे, रात्री वारंवार जाग येणे आणि अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या दूर होतात.

तेजपान असे उकळून प्या

तुम्हाला एका पातेल्यात दीड ग्लास पाणी घ्यायचे आहे. यात तीन ते चार तेजपान टाका आणि पाण्याला उकळवा. पाणी उकळल्यानंतर त्याला गाळून घ्या. पाणी कोमट झाल्यावर त्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा. याचे तुम्हाला काही दिवसांनी चमत्कारी फायदे दिसून येतील. रोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Israel Gaza Conflict: गाझावर पुन्हा हल्ल्याची तयारी; इस्राईलचा पवित्रा, हमासचे सक्रिय गट लक्ष्य करणार

Krishna River Flood Sangli : कृष्णा नदीचे पाणी सांगलीत घुसले, पाणी पातळी गेली ४० फुटांवर; कोयनेचा विसर्ग स्थिर, चांदोलीतून कपात

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून तब्बल 1 लाख 41 हजार 600 क्युसिक विसर्गाने पाणी भीमा नदीत केला

SCROLL FOR NEXT