Bone Strengthening Foods
Bone Strengthening Foods esakal
आरोग्य

Bone Strengthening Foods : हाडांच्या योग्य पोषणासाठी योग्य कॅल्शियम कोणतं?

Pooja Karande-Kadam

Bone Strengthening Foods : मजबूत हाडांसाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे. हाडे निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने पुरेसे कॅल्शियम (calcium) आणि व्हिटॅमिन डी (vitamin D) आवश्यक आहे. संतुलित आहार घेतल्याने तुम्हाला निरोगी हाडांसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होते. कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक जीवनसत्व आहे. 

हाडे हा शरीराचा बेस असतात. हाडांची ताकद जितकी जास्त तितकी शरीराचे वजन वाढते. हाडे मजबूत असेल तर आपलं राहणीमान चांगलं राहतं, पण जर हाडे कमकुवत असतील तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा म्हातारपणी हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो.

ऑस्टिओपोरोसिस बऱ्याचदा वृद्ध लोकांमध्ये होतो. या आजारात हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका खूप वाढतो. वास्तविक २० वर्षापर्यंत हाडांचा संपूर्ण विकास होतो. पण यानंतर हाडांमधून पोषक तत्वांची गळती होत नाही, त्यासाठी आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे.

सामान्यत: लोकांना हे समजते की हाडांच्या मजबुतीसाठी केवळ कॅल्शियम पुरेसे आहे, परंतु तज्ञांच्या मते हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, प्रथिने आणि इतर अनेक प्रकारच्या खनिजांची आवश्यकता असते.

एवढेच नाही तर हाडांच्या मजबुतीसाठी ग्रोथ हार्मोन, पिट्यूटरी ग्रंथी आणि पुनरुत्पादक संप्रेरक असणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आहारात योग्य गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे.

व्हिटॅमिन सी- व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तसेच हाडांमधून पोषक द्रव्ये गळण्यापासून वाचवते. लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असतात. लिंबूवर्गीय फळांसाठी संत्री, लिंबू, किवी, आवळा इत्यादींचे सेवन करा.

व्हिटॅमिन डी

शरीरात व्हिटॅमिन डी नसेल तर शरीरात कॅल्शियम थांबणार नाही. व्हिटॅमिन डी कॅल्शियम साठवते. व्हिटॅमिन डीसाठी गोड बटाटे, मशरूम, टूना फिश, फोर्टिफाइड तृणधान्ये, तांदूळ, बदाम आणि संत्र्याचा रस खा. याशिवाय बहुतांश व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातून मिळते.

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के हाडांमधील खनिज पदार्थांची घनता राखते. विशेषत: ज्या लोकांना ऑस्टिओपोरोसिस आहे. व्हिटॅमिन के हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करते.

पोटॅशियम

शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांमध्ये पोटॅशियमचाही प्रामुख्याने समावेश होतो. पोटॅशियममध्ये मुबलक प्रमाणात खनिजं असून ते हृदय, किडनी, मेंदू आणि स्नायूंसाठी फायदेशीर ठरतं. हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी मदत करतं. तुमच्या दैनंदीन गरजा पूर्ण करण्यासाठी पोटशियमयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. पोटॅशियम शरीरातील फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यासाठी उपयोगी ठरणारं एक आवश्यक पोषक तत्व आहे.

शरीरात कॅल्शियम रोखण्यासाठी मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची देखील आवश्यकता असते. त्यामुळे शरीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम टिकवून ठेवण्यासाठी गोड बटाटे, अंजीर, बदाम, पालक, मशरूम, काकडी, हिरवे वाटाणे, फ्लॉवर, केळी, द्राक्ष, जर्दाळू इत्यादी पदार्थ खावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

SCROLL FOR NEXT