Breast Feeding Week  esakal
आरोग्य

Breast Feeding Week : बाळाला रात्री स्तनपान करण्याचे एवढे फायदे, 99% स्त्रियांना माहितीच नाही

बाळाला स्तनपान करताना वेळेचे महत्त्व जपावे, असा सल्ला स्त्री व प्रसूतरोगतज्ज्ञांनी दिला.

सकाळ ऑनलाईन टीम

Breast Feeding Week : स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे तिचे स्त्रीत्व पूर्ण करणारे मातृत्व. जगात पाऊल ठेवलेल्या या बाळासाठी आईचे दूध अमृतासमान आहे. आई आणि बाळ यांच्यातील पहिला संवाद हा स्तनपानातूनच होतो. पहिल्या दुधातून मिळणाऱ्या पोषणाची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही. आईच्या दूध बाळासाठी टॉनिक आहे. मात्र बाळाला स्तनपान करताना वेळेचे महत्त्व जपावे, असा सल्ला स्त्री व प्रसूतरोगतज्ज्ञांनी दिला.

जागतिक स्तनपान सप्ताह

१ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. बाळाला दिवसातल्या ठराविक वेळी स्तनपान करणे फायद्याचे असते. पण तसे पाहायला गेले तर आई दिवसभर आपल्या बाळाला स्तनपान करू शकते. परंतु, रात्रीच्या वेळी बाळाला दूध पाजल्याने जास्त लाभ होतो. रात्रीच्या वेळी शरीरात प्रोलेक्टिन हार्मोन जास्त असते आणि बाळाला सुद्धा रात्रीच्या वेळी जास्त भूक लागते. १ ते ६ महिन्याचे बाळ रात्री आपल्या भुकेच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त दूध पिते.

स्तनपानाचे फायदे

आईच्या दुधाने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आईचे दूध बाळाचे संसर्गापासून बचाव करते

हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाइप बी पासून बचाव होतो

बाळाला न्यूमोनिया होण्यापासून थांबवते

मेनिन्जायटिस आजारापासून बाळाला दूर ठेवता येते.

बाळाचा बोटुलिसमपासून बचाव करते

लघवीच्या जागी होणाऱ्या संसर्गापासून दूर ठेवते

पहिल्या दूधातून बाळाची झोपही पूर्ण होते (Breast Feeding)

आईला फायदा

ब्रेस्ट तसेच अंडाशयाच्या कॅन्सरची शक्यता कमी होते

मातेच्या शरीरात वाढलेल्या कॅलरीज कमी होतात.

आईचे गर्भाशय लवकर आकुंचन पावते.

रक्तस्राव किंवा रोगसंसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

गर्भाशय लवकर पूर्वस्थितीत येते

गर्भवती असताना वाढलेले मातेचे वजन कमी होते.

हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. (Health)

आई घरीच राहात असल्यास ती बराच काळ बाळाला स्तनपान करू देऊ शकते. ती कामासाठी बाहेर जात असेल, तर स्तनपान सोडण्याचा टप्पा लवकर येतो. मात्र किमान सहा महिने आईने अंगावर पाजावे. आई आणि बाळ ह्यांच्यात स्तनपानातून भावनिक सुरक्षेचे सुंदर नाते तयार होते.

-डॉ. सुषमा देशमुख, ज्येष्ठ स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT