Butter Coffee esakal
आरोग्य

Butter Coffee: बटर कॉफीने मेणासारखे वितळतील फॅट्स; दोन मुलांची आई असलेल्या अभिनेत्रीचं Weight Loss सिक्रेट

बाळंतपणानंतर वजन वाढणे हा फार सामान्य प्रश्न झाला आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Butter Coffee For Weight Loss : डिलिव्हरी नंतर वजन वाढणे ही फार सामान्य समस्या झाली आहे. पण त्यानंतर पुन्हा वजन कमी करणे ही फार अवघड गोष्ट होते असा बहुतेकांचा अनुभव आहे. अशात काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी अनेक संभ्रम निर्माण होतात. पण जर कोणी स्वतः त्याचा फायदा अनुभवला असेल तर विश्वास ठेवणं सोपं होतं.

अशी एक यशस्वी वेटलॉस स्टोरी आहे अभिनेत्री देबिना बोनर्जीची. दोन मुलांना जन्म दिल्यानंतर आता वयाच्या चाळीशीत ती या एका पेयाच्या मदतीने वजन कमी करत आहे.

देबिनाने काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या बाळाला जन्म दिला. प्रेग्नंसी आणि डिलीव्हरीच्या काळात वजन वाढलं. ते कमी करण्यासाठी तिने पुन्हा फिटनेस रुटीन सुरू केलं आहे. देबिना सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. तिथे तिने सांगितलं की ती प्रचंड अॅक्टिव्ह राहते आणि वर्क आऊट करण्यापूर्वी तिने बट कॉफी पित असल्याचा फोटो शेअर केला होता.

काही अभ्यासांतून या बटर कॉफीने खरंच वजन कमी होतं का, याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. जाणून घेऊया.

Butter Coffee

काय सांगतो अभ्यास?

  • हेल्थलाइननुसार बटर कॉफी मध्ये कॉफी पावडर, अनसॉल्टेड बटर आणि एमसीटी (medium chain triglycerides) मिसळलेलं असतं.

  • एमसीटी सहज पचणारा फॅट असतो. जो खोबरेल आणि पाम कर्नेल तेलाने प्रयोगशाळेत बनवला जातो.

  • हैद्राबादच्या एका वरिष्ठ डायटिशीयनच्या म्हणण्यानुसार या हे ड्रींक अमेरिकेचे उद्योजक डेव एस्प्रे यांनी फेमस केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की हे ड्रिंक एनर्जी देतं, एकाग्रता वाढवतं आणि वजन कमी करण्यातही मदत करतं.

Butter Coffee
  • डेव एस्प्रे यांच्यानुसार बटर कॉफीमध्ये कॅफेन आणि हेल्दी फॅट जास्त असतात. ज्यामुळे सतर्कता वाढते. शिवाय हाय फॅटमुळे भूक कंट्रोल होऊन कॅलरी इंटेक कमी होतो.

  • 237 ml म्हणजेच एक कप बटर कॉफीमध्ये २ चमचे खोबऱ्याचे तेल आणि बटर असते. त्यात 445 कॅलरी आणि 50ग्रॅम फॅट असते.

  • बटर कॉफी पिणाऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे भूक मरते आणि त्यामुळे वजम कमी होण्यास मदत होते.

Butter Coffee
  • अभ्यासानुसार बटर कॉफीमध्ये जास्त प्रमाणात फॅट असल्याने पचन क्रिया मंदावते आणि भूक कमी होते.

  • इतर काही संशोधनांनुसार देखील हेच सिद्ध झाले आहे.

  • या संशोधनादरम्यान 4 आठवडे पुरुषांनी 22 ग्रॅम एमसीटी तेलाचे नाश्त्यात सेवन केले. निरीक्षणातून असं लक्षात आलं की , नंतर दुपारच्या जेवणात त्यांनी 220 कॅलरीज कमी सेवन केले.

  • संशोधनातून हे पण समोर आलं आहे की, जर एमसीटीला डाएटमध्ये घेतल्यावर जर कमी कॅलरीजचं डाएट घेतलं तर वजन वेगात कमी होतं.

डाएट कसे असावे?

  • जर तुम्हीही बटर कॉफी पित असाल तर आपल्या डाएटची काळजी घ्या. त्यात जास्त प्रोटीन, फळ आणि भाज्यांचा समावेश असू द्या.

  • बटर कॉफीत फॅट बऱ्याच प्रमाणात असल्याने इतर जेवणात कमी फॅट घ्यावे.

  • बटर कॉफीत सॅच्युरेटेड (खराब फॅट्स) पण भरपूर आहे. त्यामुळे दिवसभरात एवोकाडो, नट्स, धान्य आणि मासे असे मोनो आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचे (हेल्दी) सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT