Weight Loss Tips esakal
आरोग्य

Weight Loss Tips : अंडी अन् पनीर एकत्र खाल्ल्यास वजन कमी होतं काय? वाचा सविस्तर

या दोन्ही पदार्थांत कॅलरी कमी आणि प्रोटीन जास्त असते. हे दोन्ही पदार्थ भूक कमी करणारे हार्मोन्स वाढवतात

सकाळ ऑनलाईन टीम

Egg Paneer Combination : हल्ली असे बरेच लोक आहेत जे वाढत्या वजनाने जास्त चिंतेत आहेत, मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. काही लोक वजन नियंत्रित करण्यासाठी अंडी आणि पनीर खातात, कारण या दोन्ही पदार्थांत कॅलरी कमी आणि प्रोटीन जास्त असते. हे दोन्ही पदार्थ भूक कमी करणारे हार्मोन्स वाढवतात. पनीर आणि अंडी एकत्र खाल्ल्याने शरीराला काही फायदा होतो की नाही हा प्रश्न अनेकदा अनेकांना पडतो तो अनेक डाएट एक्सपर्टना विचारलाही जातो, चला तर मग या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊया.

अंडी वजन कमी करण्यास कशी मदत करेल?

अंडी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे यात शंका नाहीच, ते खाल्ल्याने आपल्या शरीरातील आवश्यक अमीनो ऍसिडचे संतुलन राखले जाते. अंडी आपली चयापचय शक्ती वाढवून वजन कमी करण्यात खूप मदत करते, ते आपल्या कंबर आणि पोटाभोवतीची चरबी देखील कमी करते.

पनीर वजन कसे कमी करते?

पनीर हा आपल्यासाठी इंस्टंट एनर्जीचा स्त्रोत आहे, ज्यामुळे आपण दैनंदिन जीवनातील कामे सहज करू शकतो, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पनीरचे अनेक स्वादिष्ट पदार्थ प्रत्यक्षात वजन वाढवतात, विशेषतः त्या पाककृती ज्यामध्ये तेल आणि मसाले वापरले जातात. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी पनीर टिक्कासारखे आरोग्यदायी पर्याय निवडावेत. दिवसभरात जास्त पनीर खाणे टाळा कारण त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. (Health)

पनीर आणि अंडी एकाच वेळी खाणे फायदेशीर ठरेल का?

प्रोटीनयुक्त अंडी आणि पनीर वजन कमी करण्यासाठी आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ग्रेटर नोएडामधील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी सांगितले की, दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय आहेत. प्रोटीन्स हळूहळू पचत असल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तुम्ही अंडी आणि पनीर एकाच वेळी खाऊ शकता, यात काही नुकसान नाही, मात्र जास्त प्रमाणात सेवन करणे देखील योग्य नाही. तेव्हा योग्य समतोल राखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe यांची बदली का रखडली? पडद्यामागे काय घडतंय? नाशिक कुंभमेळ्याशी काय संबंध अन् सरकारमधील कोणाचा विरोध?

LPG Eligibility Rules : ५ किलोचा 'छोटू' गॅस सिलिंडर फक्त 'या' लोकांनाच मिळणार; जाणून घ्या काय आहे नियम?

Pune News: नदी प्रदूषणमुक्तीसाठी काम करा; पुण्यातील बैठकीत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचा आदेश,‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापनचा निर्णय..

Atpadi Crime: लग्नं केली चार; दागिन्यांसह वधू पसार, आटपाडीत टोळी जेरबंद; लग्नाच्या आमिषाने लुबाडणूक, पाचव्या लग्न अन् काय घडलं..

Kolhapur Crime: भाताच्या कोंड्यात लपवले एक कोटीचे मद्य; तेराशे बॉक्स जप्त, पंजाबकडे जाणारा ट्रक पकडला, दोघे अटक

SCROLL FOR NEXT