Cancer Prevention Juice esakal
आरोग्य

Cancer Prevention Juice : एक ग्लास ज्यूस अन् सगळे आजार पळेल दूर, हा ज्यूस रोज प्या

कोणत्या पालेभाज्यांचा रस तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरणार आहे ते आपण जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Cancer Prevention Juice : हिरव्या पालेभाज्या या कायम शरीरासाठी आरोग्यदायी असतात असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. आज आम्ही तुम्हाला हिरव्या पालेभाज्यांचे असे काही फायदे जाणून घेणार आहोत ज्याने सगळे आजार तुमच्यापासून कायम दूर पळतील. चला कोणत्या पालेभाज्यांचा रस तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरणार आहे ते आपण जाणून घेऊया.

पालकात विटामिन, खनिज तत्व आणि अमीनो एसिड भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आणि पोषक असं आहे .कच्चा पालक जर ज्यूस करून प्यायला तर त्यातून अधिक प्रमाणात पोषण मिळतं. जे केवळ शरीरालाच न्हवे तर केस आणि त्वचेसाठीसुद्धा तितकंच फायदेशीर आहे.

स्किनसाठी आहे खूप फायदेशीर 

  • रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येतं. 

  • चेहऱ्यावर डाग असतील किंवा सुरकुत्या असतील त्यासुद्धा कमी होण्यास मदत मिळते. 

  • पालक ज्यूस चेहऱ्याला सॉफ्ट आणि  हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.

  • पालक चा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही. 

केसांसाठी आहे बहूउपयोगी

  • पालक ज्यूस प्यायल्याने केसांशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात 

  • डोक्यात सतत खाज उठत असेल तर ती समस्या निघून जाईल 

  • पालकात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असल्याने केसांची वाढ चांगली होते 

  • केसांची चमक वाढवायची असेल तर पालक ज्यूस हा अत्यंत फायदेशीर आहे रोज प्यायलाच पहिजे.

आरोग्यासाठी तितकाच महत्वाचा 

  • पालक ज्यूस प्यायल्याने ऍनिमियाचा धोका कमी होतो. (spinach juice for anemea)

  • संधिवात कमी होण्यास फायदेशीर 

  • हिरड्यांसंबंधित काहीही तक्रार असेल तर पालक ज्यूस प्यायलाच हवा 

  • रोज पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.

त्यामुळे उत्तम आरोग्य आणि त्याचसोबत सुंदर चेहरा आणि  सुंदर केस हवे असतील तर रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायला सुरु करा . (Vegetable)

जागतिक कर्करोग वेधशाळेने (Globocan) वर्तवलेल्या अंदाजानुसार 2040 पर्यंत जगात कॅंसरने (Cancer) हाहाकार माजेल. 2040 पर्यंत जगात कँसर रुग्णांची संख्या 2020 च्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढलेली असेल. (Health) म्हणजे वर्षाला ही सख्या 2 कोटी 80 लाख इतकी असेल. 2020 मध्ये हीच संख्या एक कोटी 80 इतकी होती.  भविष्यात जगभरात 1 कोटी लोकं या आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT