Poonam Pandey Cervical Cancer esakal
आरोग्य

Poonam Pandey Cervical Cancer : पुनम पांडेमुळे चर्चेत आलेला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर काय आहे? जाणून घ्या उपचार व लक्षणे

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे अनेक टप्पे आहेत. त्यामुळे, सुरूवातीच्या टप्प्यात जर तुम्हाला हा कर्करोग ओळखता आला, तर त्यावर उपचार करणे शक्य होते.

Monika Lonkar –Kumbhar

Poonam Pandey Cervical Cancer : आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे टिव्ही मनोरंजन क्षेत्रात कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडेचे (Poonam Pande Death) शुक्रवारी निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु, आज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत ती जिवंत असल्याचे सांगितले आहे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी भारतात अनेक महिलांचा मृत्यू होतो. त्यामुळे, या कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे समजून घेणे हे फार महत्वाचे आहे.

दुर्दैवाने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे ही लवकर ओळखू येत नाही. दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला हा कॅन्सर गेल्यावर याची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात. आज आपण या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे कोणती आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे खालीलप्रमाणे :

  • गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये लघवीला त्रास होणे. तसेच, योनिमार्गातून होणाऱ्या व्हाईट डिसचार्जमध्ये वाढ होणे इत्यादी लक्षणांचा समावेश आहे.

  • यासोबतच जोडीदारासोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर किंवा मासिक पाळीमध्ये वापरले जाणाऱ्या टॅम्पॉन्सचा वापर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो आणि तीव्र वेदना होतात.

  • पोटात दुखणे, कंबर आणि पायांमध्ये तीव्र वेदना होणे इत्यादी लक्षण देखील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये सुरूवातीच्या काळात दिसून येतात.

  • या व्यतिरिक्त रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून होणारा रक्तस्त्राव हे या कर्करोगाचे प्रमुख आणि महत्वाचे लक्षण आहे. दुर्दैवाने अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात.अशा प्रकारचा त्रास होणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता जवळपास १० टक्के असते. (Cervical Cancer Symptoms)

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील उपचार :

या कर्करोगाचे अनेक टप्पे आहेत. त्यामुळे, सुरूवातीच्या टप्प्यात जर तुम्हाला हा कर्करोग ओळखता आला, तर त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यात ही जर लवकरात लवकर उपचार केले तर हा कर्करोग नियंत्रणात आणला जाऊ शकतो.

यासाठी महिलांनी नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या आरोग्याबाबात तुम्हाला योग्य ती काळजी घेता येईल.

पॅप स्मिअर चाचणी

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी ३ वर्षांच्या अंतराने एखाद्या चांगल्या रूग्णालयातून पॅप स्मिअर चाचणी करून घ्यावी.

लसीकरण करणे

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी आणि या आजाराचा विषाणू HPV पासून संरक्षण करण्यासाठी यावर लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT