Chamomile Tea Benefits  esakal
आरोग्य

Chamomile Tea Benefits : पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे कॅमोमाईल टी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Chamomile Tea Benefits : आरोग्यासाठी फायदेशीर असणारा कॅमोमाईल टी हा अनेकांच्या मॉर्निंग रूटीनचा एक महत्वाचा भाग आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Chamomile Tea Benefits : आरोग्यासाठी फायदेशीर असणारा कॅमोमाईल टी हा अनेकांच्या मॉर्निंग रूटीनचा महत्वाचा भाग आहे. या चहाची चव ही सौम्य गोड असते. या कॅमोमाईलला 'कॅमोमाईल फ्लॉवर' असे ही म्हटले जाते. या फुलापासूनच हा चहा बनवला जातो.

हे कॅमोमाईल फ्लॉवर (फूल) विशेषत: आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेत आढळते. या चहाला हर्बल चहा म्हणून ही ओळखले जाते. या चहामध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म आढळतात. या खास गुणधर्मांमुळेच हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. आज आपण या चहाचे आरोग्याला होणारे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

पचनासाठी फायदेशीर

आपल्या शरीराची पचनक्रिया व्यवस्थित असल्यावर शरीर निरोगी राहण्यास मदत होते. ही पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कॅमोमाईल टी चा आहारात समावेश करू शकता. जेवण केल्यानंतर किमान १ तासाने तुम्ही हा कॅमोमाईल चहा पिऊ शकता.

या चहाचे सेवन केल्याने पचनाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे, आपल्या शरीराची पचनक्रिया सुरळीत चालते. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत, अशा लोकांनी कॅमोमाईल टी जरूर प्यावा. (Beneficial for digestion)

झोपेच्या समस्येवर प्रभावी

जर तुम्हाला झोपेची समस्या असेल, तर तुम्ही यावर वेळीच उपचार करायला हवेत. कारण, झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही रोज ७-८ तासांची झोप घेतली, तर शरीर निरोगी राहण्यास मदत होते. एकूणच निरोगी शरीरासाठी झोप अतिशय महत्वाची आहे.

आरोग्य तज्ज्ञ निरोगी राहण्यासाठी दररोज ७-८ तासांची झोप घेण्याची शिफारस करतात. जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल किंवा झोपेच्या काही समस्या असतील तर कॅमोमाईल टी तुमची मदत करू शकतो.

या चहाचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हा चहा प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप लागेल आणि झोपेच्या समस्या ही हळूहळू दूर होतील. रात्रीच्या जेवणानंतर १ तासाने तुम्ही शांत झोपण्यासाठी हा चहा पिऊ शकता. (Effective in sleep problems)

सर्दी-खोकल्यापासून मिळतो आराम

जर तुम्हाला सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर तुमच्यासाठी कॅमोमाईल टी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा चहा प्यायल्याने नाक बंद होण्यापासून आणि घशामध्ये होणाऱ्या वेदनांपासून ही तुम्हाला आराम मिळू शकेल. त्यामुळे, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कॅमोमाईल टी चे जरूर सेवन करा. (Relief from cold and cough)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून मओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

Ravi Sharma: शंभर कोटींचा टर्नओव्हर सांगणारे रवी शर्मा नेमके कोण? 6 लाखांची जीएसटी अन् रोल्स रॉयसचं स्वप्न

महाठग सापडला! रत्नागिरीतील तरुण मुंबईत आला, जीवनसाथी ॲपवर अविवाहित ‘पीएसआय’ असल्याची नोंदणी केली, ५० ते ६० मुला-मुलींशी संपर्क, फोनवर बोलायचा अन्‌...

Latest Marathi News Live Update: पोलिसाची गाडी बेकाबू, प्रवाशी रिक्षासह दोन दुचाकींना उडवले

SCROLL FOR NEXT