Child Care In Winter esakal
आरोग्य

Child Care In Winter : हिवाळ्यात मुलांमध्ये वाढतोय 'या' आजाराचा धोका, ही लक्षणे दिसताच व्हा सावध

हिवाळ्यात हवेत गारवा असल्यामुळे विषाणू संक्रमणाची शक्यता अधिक असते. अशा वेळी या काही लक्षणांकडे अजिबात दूर्लक्ष करू नका

साक्षी राऊत

Child Care In Winter : हिवाळ्यात वातावरणातील बदलांमुळे लहान मुलांना बऱ्याच समस्या उद्भवतात. तेव्हा त्यांची विशेष काळजी घेणे महत्वाचे ठरते. हिवाळ्यात खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास ती हवा फुफ्फुसांमध्ये जाऊन लहाम मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. हिवाळ्यात हवेत गारवा असल्यामुळे विषाणू संक्रमणाची शक्यता अधिक असते. अशा वेळी या काही लक्षणांकडे अजिबात दूर्लक्ष करू नका.

ही लक्षणे दिसताच व्हा सावध

हिवाळ्यात सर्दी खोकला झाला की तो 4-5 दिवसांत बरा होतो. पण एक वर्षापासून पाच वर्षापर्यंतच्या मुलांचा सर्दी खोकला 4-5 दिवसांत बरा न झाल्यास ही गंभीर समस्या ठरू शकते. त्याचे रुपांतर न्यूमोनियामध्ये होऊ शकते. तेव्हा वेळीच मुलांची डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

न्यूमोनियाची लक्षणे

ताप आणि खोकला

धाप लागणे, जलद श्वासोच्छ्वास

श्वास घेताना छातीत दुखणे

उलट्या होणे, भूक न लागणे

शरीरात पाण्याची कमतरता

ओठ किंवा नखे निळे होणे (Health)

या रूग्णांना असतो न्यूमोनियाचा जास्त धोका

हृदयासंबंधित समस्या किंवा विकार असलेल्यांना याचा जास्त धोका आहे

हृदयात जन्मजातच छिद्र असणे

श्वसनमार्गासंबंधित कोणत्याही प्रकारची समस्या

अकाली जन्मलेले आणि कमी वजनी जन्मलेले बाळ

कमकुवत प्रतिकारशक्ती असलेली मुले (Winter)

अशी घ्या काळजी

थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना उबदार कपडे घाला.

पिण्यासाठी कोमट पाणी द्या आणि ताजे अन्न खायला द्या.

फ्रीजमध्ये ठेवलेले थंड दूध देणे टाळा.

मुलांना हंगामी फळांचा रस आणि भाज्यांचे सूप द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; धरणात 92.70 टीएमसी पाणीसाठा : पावसाचा जोर ओसरला

Gold Price Forecast : अमेरिका-इराण संघर्षाचा सोन्या-चांदीवर परिणाम; सोन्याच्या दरावर दबाव कायम, भाव आणखी वाढणार?

Amit Shah NUC FDC: राज्यात नागरी सहकारी वित्त महामंडळ, अमित शहा यांची घोषणा, शहरी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

PMC Tree Cutting Issue : बांधकामासाठी ५०० झाडं तोडली, पण ३५०० कुठे लावली? नियमबाह्य वृक्षतोडीवरून पुणे महापालिकेची कोंडी

SCROLL FOR NEXT