Health tips green tea 
आरोग्य

Health : ग्रीन टीमध्ये 'या' दोन गोष्टींचा समावेश करताय ना? वजन कमी करण्यासाठी होईल फायदा

नैसर्गिक संयुगे आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी यांची मदत होते

सकाळ डिजिटल टीम

ग्रीन टीच चे फायदे तुम्ही माहिती असतील. ग्रीन टी पिल्याने बरेच फायदे होतात त्यामुळे दिवसातून एकवेळ तरी ग्रीन टी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी आपण वाचले किंवा ऐकले असेल. आरोग्यासाठी चांगले मानले जाणारे पॉलिफेनॉल यामध्ये आढळते. नैसर्गिक संयुगे आणि शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी यां ची मदत होते. कर्करोगासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यासाठीही ग्रीन टी उपयोगी आहे.

यामध्ये कॅटेचिन नावाचे अँटिऑक्सिडंट असतात जे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत करतात. ग्रीन टीचे फायदे जाणून अनेकांनी आपल्या जीवनशैलीत या चहाचा समावेश करुन घेतला आहे. मात्र, ते बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पितात. त्यातील कॅटकिन्स आणि कॅफिन चयापचय वाढवून चरबी जाळण्यास मदत करतात असे मानले जाते. त्यामुळे हा या ग्रीन टीला आणखी आरोग्यदायी कसा बनवता येईल यासंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत..

चहा नाही, हेल्थ ड्रिंक समजून प्या..

देशी चहाप्रेमींना ग्रीन टीची चव क्वचितच आवडते. कारण ती चव पूर्णत: वेगळी आहे. ग्रीन टीचे आरोग्यासाठी फायदे लक्षात घेता दैनंदिन जीवनात त्याचा समावेश करणे उत्तम ठरू शकते. चहाप्रेमींनी याकडे चहाचा पर्याय म्हणून न पाहता हेल्थ ड्रिंक म्हणून पहावे. जर तुम्हाला फक्त हिरवे पाणी पित आहोत असे वाटत असेल तर तुम्ही इतरही काही गोष्टी या चहात टाकू शकता. ज्यामुळे त्याचे फायदे वाढतील. आले आणि दालचिनी या दोन गोष्टी तुम्ही या चहामध्ये टाकून पिलात तर आरोग्यासाठी फायद्याचे राहिल.

ग्रीन टी कसा बनवाल?

एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात दालचिनी पावडर आणि आलं टाका. या पाण्यात दोन्ही गोष्टींचा अर्क येईपर्यंत ते उकळवा. आता एका कपमध्ये ग्रीन टीची पाने टाका. पाणी त्या उकळलेल्या पाण्यात वरून टाका. पाण्याचा रंग बदलेपर्यंत 5 मिनिटे तसेच राहू द्या. आता हा चहा गाळून प्या. त्यात गोडवा आणायचा असेल तर मधही टाकू शकता.

काय आहेत फायदे?

दालचिनी आणि आले या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. दालचिनीमुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. याचा मधुमेहविरोधी प्रभावही आहे. इतकेच नाही तर अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये हे फायदेशीर मानले जाते. काही अभ्यासांतून त्याचे कर्करोगविरोधी गुणधर्म दिसून आले आहेत. हे परिणाम चाचणी ट्यूब आणि प्राण्यांच्या अभ्यासावर आधारित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT