आरोग्य

Winter Recipe : गुलाबी थंडीत 'लवंग चहा'ने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; व्हायरलपासून मिळेल संरक्षण

सर्व प्रकारचे चहा ट्राय केलेत… आता असा बनवा लवंग चहा. हिवाळ्यातील सर्दी- खोकल्यापासून ते अगदी वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदे लवंग चहाचे आहेत.

Aishwarya Musale

आपण आतापर्यंत ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी यासह विविध प्रकारच्या चहांची चव घेतली आहे. शरीराला यातून मिळणारे फायदेही आपण पाहिले तसेच अनेकांनी अनुभवलेही असतील. विशेषत: कारोना काळात अनेकांनी रोगप्रतिकाशक्ती वाढविण्यासाठी विविध काढेदेखील घेतले.

पण आज आपण अशा चहाबद्दल चर्चा करणार आहोत ज्यातून एक नव्हे तर अनेक फायदे शरीराला होतील. लवंगपासून तयार केलेल्या चहापासून शरीराला अनेक चमत्कारीत फायदे होतात. हिवाळ्यातील सर्दी- खोकल्यापासून ते अगदी वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदे लवंग चहाचे आहेत. 

लवंग दिसायला अगदी छोटीशी असली तरी त्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत. अनेक आजार आहेत ज्यावर औषध म्हणून आयुर्वेदात घरगुती पदार्थ मग त्यात मसाले असो किंवा इतर अन्नपदार्थ यांचा रामबाण उपाय म्हणून वापर सांगण्यात आला आहे. 

आज आपण लवंग चहा कसा तयार करायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत. लवंगाच्या चहाचे सेवन केल्याने सर्दी-खोकला, घसा खवखवणे आणि नाक बंद होण्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय पोटदुखी आणि मळमळ यासारख्या समस्यांवरही लवंग उपयुक्त ठरत आहे.

लागणारे साहित्य:

तिन लवंगा

एक कप पाणी

मध

तुळशीचे पान

कृती:

लवंग चहा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक कप पाणी घाला.

मग त्यात लवंग टाकून नीट उकळा.

यानंतर तुळशीचे पाने घालून किमान 3-5 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.

नंतर तयार चहा एका कपमध्ये गाळून घ्या.

आपण आपल्या चवीनुसार मध देखील घालू शकता.

आता तुमचा गरमागरम लवंग चहा तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटी रोख, चार रायफल, दोन पिस्टल, सहा हजार काडतुसे! ; डाॅन बाबा फर्जनच्या घरात घबाड

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

SCROLL FOR NEXT