Foods sakal
आरोग्य

Healthy Foods: निरोगी मानसिक आरोग्यासाठी करा या पदार्थांचे सेवन, जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ

सकस पदार्थ हे तुम्हाला निरोगीही ठेवतात आणि अनेक आजारांपासून तुमचे संरक्षणही करतात.

Aishwarya Musale

तुमच्या आहारात निरोगी अन्नाचा वापर करत असाल तर त्याचे तुम्हाला दुहेरी फायदे होतात. एक तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास याचा फायदा होतो. 

उत्तम आहारामुळे आपले शरीर निरोगी तर राहतेच, पण मात्र, अनेकदा आपल्या आहाराचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आपण जे काही खातो-पितो त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नैराश्य आणि चिंता याबाबतच्या समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर आपल्या आहारावर अवलंबून असतात. संतुलित आणि पोषक तत्त्वांनी युक्त आहाराच्या सेवनामुळे तुमच्या शरिरातील ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत करते, त्याचबरोबर तुमची सकारात्मक विचारसरणी वाढविते. आज आम्ही तुम्हाला मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे त्याबाबत सांगणार आहोत.

1. मूड बूस्टर फूड्स

ओमेगा-3 फॅटी अॅसिड जास्त असलेले पदार्थ्यांचे सेवन केल्याने आपला मूड सकारात्मक राहण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही सॅल्मन, ट्युना, ऑयस्टर, चिया सीड्स, अक्रोड, सोयाबीन, फ्लेक्स सीड्स, एवोकॅडो आदी पदार्थांचा समावेश आहारात करावा. याच्या सेवनामुळे नैराश्य, थकवा आदी समस्यांपासून बचाव होण्यास मदत मिळेल.

2. संप्रेरक अन्न

डार्क चॉकलेट, केळी, अंडी, दही, बदाम, विविध प्रकारच्या बेरी इत्यादींचा आहारात समावेश केल्याने शरीरातील आनंदी संप्रेरके सक्रिय होण्यास मदत मिळते. यामुळे तुम्ही मानसिक थकवा आणि भावनिक तणावापासून स्वतःला वाचवू शकता. आनंदी संप्रेरक म्हणजे सेरोटोनिन हा एक न्यूरोट्रांसमीटर आहे जो मूड कंट्रोल म्हणून काम करतो याचा वापर अँटीडिप्रेसंट औषधांमध्येदेखील केला जातो.

3. लोहयुक्त पदार्थ

लोहाचे सेवनामुळे आपली मनःस्थिती आणि मानसिक आरोग्यावरदेखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. शरिरातील लोहाच्या कमतरतेमुळे चिंता, चिडचिड, नैराश्य आणि एकाग्रता कमी होणे, यांसह अनेक मानसिक समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी रोजच्या आहारात पालक, मसूर, ब्रोकोली आणि नट्स आदींचा समावेश केल्यास फायदेशीर ठरू शकते.

(सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT