BF.7 Variant Sakal
आरोग्य

BF.7 Variant : नव्या व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी?; अभ्यासातून धक्कादायक खुलासे

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आलेली भयानक दृश्ये आजही लोक विसरलेले नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

Omicron New Variant BF.7 : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आलेली भयानक दृश्ये आजही लोक विसरलेले नाहीत. त्यात आता पुन्हा चीनमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या BF.7 व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे.

चीन, अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये BF.7 या नव्या व्हेरिएंटमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या चार बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटमुळे अनेकांच्या मनाच प्रश्न उपस्थित झाला आहे की, यापूर्वी ज्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली आहे. ती या नव्या व्हेरिएंटवर किती प्रभावी आहे. याबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

जुनी लस BF.7 वर प्रभावी होईल का?

सेल होस्ट आणि मायक्रोब जर्नलमधील स्टडीनुसार, BF.7 व्हेरिएंटविरोधात पूर्वी घेतलेल्या लसीला चकम देत शरिरात घुसून बाधित करण्यास सक्ष्हम असल्याचे सांगितले जात आहे.

पूर्वीच्या लसीमुळे जरी अनेकांच्या शरिरात अँटीबॉडिज तयार झालेल्या असल्या तरी या व्हेरिएंटची लागण होऊ शकते असेही या स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनमध्ये R346T म्युटेशनामुळे तयार झालेल्या या व्हेरिएंटवर अँटीबॉडीज परिणाम करत नसल्याचेही समोर आले आहे.

मागील व्हेरियंटच्या तुलनेत BF.7 चा 'R' व्हॅल्यू सर्वाधिक

मागील कोरोनाच्या व्हेरिएंटपेक्षा BF.7 ची R व्हॅल्यू 10 ते 18 दरम्यान आहे. याचा अर्थ असा की, BF.7 व्हेरिएंट बाधित व्यक्ती त्याच्या आसपासच्या 10 ते 18 लोकांमध्ये संसर्ग पसरवू शकते.

नव्या व्हेरिएंचा R व्हॅल्यू यापूर्वीच्या व्हेरिएंच्या तुलनेत अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले आहे. कोरोना विषाणूच्या अल्फा व्हेरिएंटची R व्हॅल्यू 4-5 आणि डेल्टा व्हेरियंटची R व्हॅल्यू 6-7 अशी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT