cough
cough esakal
आरोग्य

Cough and cold: सर्दी-खोकला झालाय मग 'हे' घरगुती उपाय करून बघा लगेच आराम मिळेल

सकाळ डिजिटल टीम

आता वातावरणातील बदलामुळे सर्दी आणि खोकला लोकांसाठी खास करून लहान मुलांसाठी नेहमीचीच समस्या बनली आहे. इतकेच नाही तर कधी उन्हामुळे तर कधी पावसामुळे आपल्या शरीराला तापमान असंतुलित होत आणि मग आरोग्याच्या समस्या सुरू होतात परिणामी लोकांना सर्दी, खोकलाचा सामना करावा लागतो. हे असे आजाराच्या व्हायरसमुळे आजुबाजूचे लोक देखील बळी पडू शकतात.

अशा सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी, स्वतःला हायड्रेट ठेवणे आणि वेळोवेळी वाफ घेणे देखील आवश्यक आहे. दरम्यान इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात विषाणू, बॅक्टेरिया आणि इतर संसर्ग होण्याचा धोका दुपटीने जास्त असतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया सर्दी-खोकला समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी कोणत्या घरगुती उपायांचा अवलंब करावा.

● लाल मिरची आणि मसाले सेवन करावे

साधारणपणे तिखट-मसाले कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण या गोष्टी खोकल्यामध्ये औषधाप्रमाणे काम करतात. लाल मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे रसायन आढळते जे श्लेष्मा कमी करण्यास मदत करते. तसेच सर्दी आणि घसा खवखवणे हे मुळापासून नाहीसे करण्याचे काम करते. त्यामुळे बदलत्या ऋतूमध्ये लाल मिरची मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

●अननस रस प्यावा.

अननस हे एक असे फळ आहे ज्याचा गोडवा आपल्यापैकी बहुतेकांना आकर्षित करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का की त्याचा रस प्यायल्यास सर्दी-खोकला आणि क्षयरोग यांसारख्या आजारांपासून मुक्ती मिळते. यासाठी पाइन अॅपल ज्यूसमध्ये मीठ, मध आणि काळी मिरी मिसळून प्या. यामुळे घशातील श्लेष्मा हळूहळू नाहीसा होतो. या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून आपले संरक्षण करतात

● स्टीम थेरपी म्हणजे घरच्या घरी वाफ घ्यावी.

जर नाक आणि घशात श्लेष्मा जमा झाला असेल आणि तुम्हाला तो आतून साफ करायचा असेल तर तुम्ही स्टीम थेरपी वापरू शकता. यासाठी एका छोट्या भांड्यात पाणी उकळून त्यात मीठ आणि बाम मिसळा. त्यानंतर टॉवेलच्या साहाय्याने डोके झाकून भांड्यातील गरम वाफ घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे नाक आणि घसा स्वच्छ होईल आणि सर्दीपासून आराम मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT