Covid Symptoms esakal
आरोग्य

Covid Symptoms : कोरोनाची नवी लक्षणं कोणती?; या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका!

सध्या कोरोना पेशंटना होणाऱ्या या आजाराची लक्षणे बदलली आहेत

सकाळ डिजिटल टीम

गेली दोन वर्ष कोरोना काळात आपण एवढा सहन केलाय की, घराघरातील लहान बालकांनाही कोव्हिड-19 कशाने होतो, त्याची लक्षणे काय हे पाठ झाले आहे. त्यामुळे थोडी जरी घशात खवखव किंवा ताप आला तरी लगेच त्याकडे दुर्लक्ष न करता उपचार केले जातात. पण, आता कोरोनाने त्याची लक्षणेच बदलली आहेत.

होय, गेली दोन वर्ष एकाच प्रकारच्या आजाराने कोरोनाची लागन व्हायची. कोरोना आणि ओमायक्रॉन या आजारांनी अनेक लोकांचे जीव घेतले. पण, आता पुन्हा एकदा कोरोनाने नांगी वर काढली आहे. पण, सध्या कोरोना पेशंटना होणाऱ्या या आजाराची लक्षणे बदलली आहेत. आता सर्दी खोकला नाही तर एका शरीराच्या एका अवयवावर तिव्र वेदना होतात.

तूमच्या स्नायूंचे दुखणे हे कोविडचे नवे लक्षण आहे. झो कोविड स्टडीनुसार, कोव्हिड-19 चा थेट परिणाम तूमच्या खांद्यावर आणि पायांवर होतो. कोव्हिड-19 ची लागण झालेल्या व्यक्तीच्या खांद्यांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. दैनंदिन कामात व्यस्त असताना लोक त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू शकतात. त्यामुळे कोविडसारख्या गंभीर आजाराचा धोका अधिक वाढू शकतो.

दुखणे सामान्य नाही हे कसे ओळखावे

खांदे आणि पाय दुखण्याची समस्या सलग 2 ते 3 दिवस असेल तर ते सामान्य असते. पण, जर तुम्हाला ही समस्या त्यापेक्षा जास्त काळ असेल तर तुम्हाला कोव्हिड-19 ची चाचणी करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीरावरील इतर स्नायूंच्या दुखण्याकडेही दुर्लक्ष करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT