Chronic Anxiety google
आरोग्य

Chronic Anxiety: अँक्झायटीपेक्षाही धोकादायक आहे क्रॉनिक अँक्झायटी ; जाणून घेऊयात क्रॉनिकची कारणे आणि लक्षणे!

Cronic Anxiety: health chronic anxiety is more dangerous than anxiety

नमिता धुरी

मुंबई : कोरोना काळात अनेक बारिक सारिक आजार आपल्याला होऊन गेले पण, आपल्याला त्याची जाणिव झाली नाही. धावपळीच्या युगात अनेक नवीन आजार वेगाने विकसित झाले आहेत. काही वर्षांपूर्वी जिथे चिंता आणि नैराश्यासारखे आजार अधूनमधून ऐकायला मिळत होते, पण आता बहुतेक लोकांमध्ये हे दिसून येते. सध्या लोक मोठ्या प्रमाणावर चिंतेचे शिकार होत आहेत.

चिंतेतील पुढची पायरी म्हणजे क्रॉनिक अर्थात तीव्र चिंता अधिक धोकादायक आहे. तीव्र चिंता ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये अनेक वर्षापासून एखादी व्यक्ती चिंताग्रस्त असते.

तीव्र चिंता हा आजार तुमच्या मानसिक स्वास्थासोबत जोडला आहे. याचा अर्थ तुम्ही मानसिक रोगी नाही किंवा पागलही नाही. अनेक लोकांनाचा हा गैरसमज आहे की मानसिक आजार म्हणजे तुम्ही पागल आहात असं मुळीच नाही.. कधीकधी लोक याला नैराश्य देखील म्हणतात. हा आजार नैराश्यापेक्षा वेगळा असला तरी या क्रॉनिक आजारात लोक त्यांच्या दैनंदिन समस्या आणि रोगांबद्दल चिंताग्रस्त होतात.

प्रकार

जनरलाइज्ड एंग्जायटी डिसऑर्डर, ऑब्सेसिव कॉम्प्लुसिव डिसऑर्डर, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, सोशल एंग्जायटी डिसऑर्डर,पॅनिक डिसऑर्डर

याची लक्षणे

नेहमी चिंताग्रस्त राहणे, अचानक भीती वाटणे किंवा घाबरणे,

वारंवार वेड्यासारखा विचार करत बसणे, चिडचिड होणे, तोंड सतत कोरडे होणे किंवा मळमळणे, हाडे दुखणे किंवा तणाव जाणवणे, सतत थकल्यासारखे वाटणे, झोप न लागणे

क्रॉनिक अँक्झायटीची कारणे

अनुवांशिकता

क्रॉनिक अँक्झायटी कधीकधी माणसांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे होते. जर तुमच्या कुटुंबात असे लोक असतील तर कालांतराने हा आजार तूमच्याकडे येऊ शकतो. पण, याची आधीच माहिती घेतली तर त्यानुसार आपले जीवन तूम्ही काळजी करणे बंद करूव हा आजार आटोक्यात आणू शकता.

जूना आघात

कोणताही जूना अपघात, एखादी वाईट घटनेचा आपल्यावर परीणाम होतो. त्यामुळे अशा तणाव किंवा इतर नकारात्मक घटकांमुळे एखाद्याला दीर्घ काळासाठी क्रॉनिक अँक्झायटी आजार होण्याची भिती असते. त्यामुळे तूमच्या चिंतेचे कारण हे अशी कोणती घटना तर नाही ना, हे तपासा. कारण यावर आणि इतर कारणांवर उपचार करण्याची पद्धती वेगवेगळी आहे.

सामाजिक समस्या

काहीवेळा सामाजिक मुद्देही तूमच्या चिंतेचे कारण बनू शकतात. समाजात मनाविरूद्ध घडलेल्या घटना आपल्या मनावर आणि जीवनावर खोल परिणाम करतात.

लाजाळू व्यक्तिमत्त्व

जे लोक लाजाळू आहेत किंवा नवीन परिस्थितीत जाण्याबद्दल चिंताग्रस्त किंवा अस्वस्थ आहेत. त्यांना देखील अँक्झायटी होण्याची शक्यता दाट असते. आणि नंतर क्रॉनिक अँक्झायटी मध्ये बदलू लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT