Curd Benefits esakal
आरोग्य

Curd Benefits : वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी दही खायला सुरुवात करा, शरीराला मिळतील हे फायदे

दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, आयरन, विटामिन बी भरपूर प्रमाणात असतात. रोज दही खाल्ल्याने पोटाचा त्रास होत नाही.

साक्षी राऊत

Curd Benefits : दह्याचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीच असेल. मात्र रोज संध्याकाळी दह्याचे सेवन केल्याने आणखी बरेच आरोग्यदायी फायदे तुम्हाला होईल. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, आयरन, विटामिन बी भरपूर प्रमाणात असतात. रोज दही खाल्ल्याने पोटाचा त्रास होत नाही.

रोजच्या जेवणात दह्याचे सेनव करणे आरोग्यासाठी उत्तमच. पण तुम्ही काही कारणास्तव दुपारी दह्याचे सेवन करू शकत नसाल तर संध्याकाळी दही खा. आज आपण संध्याकाळी दही खाण्याचे बरेच फायदे जाणून घेणार आहोत.

संध्याकाळी दह्याचे सेवन केल्यास शरीराला होतील हे फायदे

निरोगी पोटासाठी लाभदायी

दही पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. त्यामुळे तुमचे अन्न पचण्यास मदत होते. म्हणून जर तुम्ही संध्याकाळी दही खाल्ले तर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत. म्हणूनच तुम्ही संध्याकाळी दह्याचे सेवन करू शकता.

वजन कमी करते

दह्यामध्ये कॅलरीज कमी असल्याने, ते तुमचे पचन सुधारण्यास आणि चयापचय गतिमान करण्यास मदत करते. दुसरीकडे, जर तुम्ही रोज दह्याचे सेवन केले तर वजन नियंत्रणात राहते.

हाडे मजबूत होतात

हाडे मजबूत करण्यासाठी दह्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. कारण दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. जे शरीरातील हाडे आणि दात मजबूत करण्याचे काम करते. तेव्हा जर तुम्हीही रोज दह्याचे सेवन केले तर तुमच्या शरीराची हाडे मजबूत होतील.

प्रतिकारशक्ती

जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर याचा अर्थ तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे. अशा वेळी जर तुम्ही रोज दही सेवन केले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल. (Health)

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT