curd or buttermilk which best  
आरोग्य

Health News : दही की ताक?, आयुर्वेदानुसार शरीरासाठी फायदेशीर काय?

उत्तम पचन आणि आरोग्यासाठी नियमित दह्याचा आहारात समावेश करा असा सल्ला दिला जातो.

सकाळ डिजिटल टीम

उत्तम पचन आणि आरोग्यासाठी नियमित दह्याचा आहारात समावेश करा असा सल्ला दिला जातो.

अनेक लोक ताकापेक्षा दही खाण्यास अधिक पंसदी दर्शवतात. त्यामुळे दही तुलनेत सर्वाधिक लोकप्रिय आहे असे म्हटले जाते. उत्तम पचन आणि आरोग्यासाठी नियमित आहारात दह्याचा समावेश करा असा सल्ला डॉक्टर देतात. तज्ज्ञ दह्यापेक्षा ताकाला प्राधान्य दिले पाहिजे असे सांगतात. कारण ते पचायला हलके असते. याशिवाय आयुर्वेदानुसार ताक हे शरीराला आरोग्यासाठी चांगले आहे. पण दही आणि ताक दोन्ही सारख्याच प्रक्रियेने बनवले जातात.

तज्ज्ञ काय सांगतात?

साधारणत: दह्यावर तापमानवाढीचा प्रभाव असतो. ताक नैसर्गिकरित्या थंड होते. दहीमध्ये सक्रिय बॅक्टेरियाचा ताण असतो जो उष्णतेच्या संपर्कात आल्यावर आंबतो. म्हणून जेव्हा आपण दही खातो तेव्हा ते पोटातील उष्णतेच्या संपर्कात येते आणि अधिक आक्रमकपणे आंबायला लागते. त्यामुळे शरीर थंड होण्याऐवजी गरम होते, असे तज्ज्ञांते मत आहे.

आयुर्वेदानुसार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ताकाने असे होत नाही. कारण दह्यामध्ये पाणी घालताच किण्वन प्रक्रिया थांबते. ताकामध्ये जिरेपूड, मीठ यांसारखे मसाले टाकल्याने त्याचे शरीरासाठी आणखी फायदे होतात. पचनास मदत करण्यासाठी अनेक भारतीय पदार्थांत हिंग, आले, मिरची आणि कढीपत्त्यामध्ये तूप मिसळले जाते. ताक हे नैसर्गिकरित्या थंड असते मात्र दह्याला शरीरात पचण्यासाठी अधिक वेळ लागतो.

आयुर्वेदानुसार दही खाण्याचे नियम...

तज्ज्ञांच्या मते दही हे आंबवलेले असते. ते चवीला आंबट, गरम आणि पचायला जड असते. ते चरबी वाढवण्यास कारणीभूत असते. यामुळे शरीरातील असंतुलन कमी होते आणि शरीर स्थिर करण्यास मदत होते. मात्र तरीही काही बाबतीत दही खाणे टाळावे कारण तुम्हाला जर लठ्ठपणा, कफाचे विकार, रक्तस्त्राव, दाहक विकार, जडपणा वाढणे आणि संधिवात असेल तर दही खाणे टाळा.

रात्रीचे दही खाणे टाळावे कारण त्यामुळे सर्दी, खोकला, सायनस होऊ शकतो. पण जर तुम्हाला रात्री दही खाण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर काळी मिरी किंवा मेथी टाका. दही गरम करणे टाळा. कारण ते सर्व बॅक्टेरिया नष्ट करते. त्वचेचे विकार, पित्ताचे असंतुलन, डोकेदुखी, झोपेचा त्रास आणि पचनाचे विकार असलेल्या लोकांसाठी दही खाणे योग्य नाही.

दह्याऐवजी ताकचा वापर करा कारण...

ताकाचा उपयोग आरोग्यासाठी आणि रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. ताक हे पचायला सोपे, तुरट आणि आंबट चवीचे असते. अशा स्थितीत पचनक्रिया सुधारते आणि तिन्ही प्रकारच्या शरीरासाठी याचा उपयोग होतो. हिवाळ्यातील अपचनाच्या उपचारासाठीही ताक हे फायदेशीर आहे. दह्याऐवजी ताक हा नेहमीच एक उत्तम पर्याय म्हणून मानला जातो. हे मानवासाठी अमृत समतुल्य असल्याचे म्हटले जाते. १ ग्लास पाण्यात २ चमचे दही, थोडी जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून तुम्ही पिऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT