Roti Rice In Diet esakal
आरोग्य

Roti Rice In Diet: रोज जेवणात चपाती भात खाताय? हे वाचून तुमचे बरेच गैरसमज दूर होतील...

जेवणात हे दोन्ही पदार्थ एकत्र घेण्याची पद्धत कितपत योग्य याची तुम्हाला कल्पना आहे काय?

सकाळ ऑनलाईन टीम

Health Care: सकाळी संध्याकाळी भूक लागली की लगेच आठवण येते ती घरच्या जेवणाची. बाहेर तुम्ही नाश्ता किंवा फास्ट फूड कितीही खाल्लं तरी घरच्या जेवणानेच तुमचं पोट भरतं. घरच्या रोडच्या जेवणात चपाती भात आवर्जून असतोच. मात्र जेवणात हे दोन्ही पदार्थ एकत्र घेण्याची पद्धत कितपत योग्य याची तुम्हाला कल्पना आहे काय?

पोळी, डोसा आणि भातासारख्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे तुम्हाला डायबिटीजचा धोका उद्भवतो. CMR नं केलेल्या एका निरीक्षणातून समोर आलेल्या अहवालानुसार एखाद्या व्यक्तीनं आहारातून कार्बोहायड्रेट्स कमी केल्यास त्या व्यक्तीला मधुमेह अर्थात डायबिटीजचा (Diabetes) धोका कमी असतो.

भारतीयांच्या आहारात 70 टक्के कार्बोहायड्रेट्स, 20 टक्के स्निग्ध पदार्थ आणि 10 टक्के प्रोटीन असते. हे प्रमाण तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. खरं तर भारतीयांच्या आहारात 50 टक्के कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी आणि 20 टक्के प्रोटीनचे प्रमाण जास्त असायला हवे. कार्बोहायड्रेट कमी करायचे म्हटल्यास संपूर्ण बंद अजिबात करू नका. त्याने तुमच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात.

मेंदूसाठी आवश्यक असलेल्या ग्लुकोजवर याचा परिणाण होतो. त्यामुळे फास्ट फूडचा वापर कमी करा व कोल्ड ड्रिंक पिणं टाळा.

आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करायला हवा

चपाती भातातील कार्ब्सचं प्रमाण तुम्हाला कळल्याने तुम्ही आहारातून ते जर कमी करत असाल तर त्याला पर्यायी पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करणे फार महत्वाचे ठरते.

इथं तुम्ही तांदळाऐवजी नाचणी आणि ज्वारी-बाजरीपासून तयार झालेले पदार्थ खाऊ शकता. तसंच Grilled Chicken, उकडलेली अंडी (Boiled Eggs), ऑम्लेट (omelette), पालेभाज्या, फळभाज्या, मोसमी फळं यांचा समावेश तुमच्या आहारात करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT