11 year old girl dies after eating pizza Sakal
आरोग्य

Dairy Allergy: पिझ्झा खाऊन होऊ शकतो घात, ११ वर्षीय मुलीचा पिझ्झा खाऊन मृत्यू

11 year old girl dies after eating pizza: टेक्सास शहरातील एका शाळेत पिझ्झा खाल्ल्यानंतर एलर्जीमुळे 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

पुजा बोनकिले

11 year old girl dies after eating pizza: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फ्रेंच फ्राइज, बर्गर आणि पिझ्झासारखे फास्ट फूड मोठ्या आवडीने खातात. संशोधकांचे म्हणणे आहे की, या प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर खराब होऊ शकते. जे लोक या पदार्थांचे जास्त प्रमाणात किंवा वारंवार सेवन करतात त्यांना पचनसंस्थेपासून ते मधुमेहापर्यंत रक्तदाबापर्यंत अनेक आजार उद्भवू शकतात. पण हे पदार्थ खाल्ल्यास कोणाचा मृत्यू होऊ शकतो का?

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच टेक्सास शहरातील एका शाळेत पिझ्झा खाल्ल्यानंतर एलर्जीमुळे एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्यांनी वेळीच उपचार केले असते तर तिचा जीव वाचू शकला असता, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पिझ्झा खाल्ल्याने कोणाचा मृत्यू कसा होऊ शकतो? प्रत्येकाने जंक-फास्ट फूडपासून दूर राहावे का? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया.

पिझ्झा खाल्ल्यानंतर मृत्यूची ही पहिली घटना नाही. याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इटलीमध्ये पिझ्झा खाल्ल्याने ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. पिझ्झा खाल्ल्यानंतर तिला पोटात दुखू लागले. बोट्युलिनम नावाच्या जीवाणूमुळे होणारे अन्न विषबाधा मृत्यूचे कारण असल्याचे मानले जात होते.

अलीकडच्या प्रकरणात, मीडिया रिपोर्ट्सनुसार, इमर्सन केट कोल (11 वर्षे) ही टेक्सासमधील एका शाळेची विद्यार्थिनी होती. पिझ्झा खाल्ल्यानंतर तिला डेअरी अॅलर्जी झाली, ज्यामुळे तिची तब्येत बिघडली. तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न करूनही कोलचा मृत्यू झाला. वेळेवर योग्य उपचार न दिल्याने कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे

डेअरी ऍलर्जी म्हणजे काय?

दुग्धजन्य पदार्थ किंवा दुधाची ऍलर्जी ही प्रतिरक्षा प्रणालीची दूध असलेल्या उत्पादनांसाठी एक असामान्य प्रतिक्रिया आहे. दुधाच्या ऍलर्जीमुळे घरघर, उलट्या, पित्त आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये, यामुळे ॲनाफिलेक्सिस, एक गंभीर आणि जीवघेणी प्रतिक्रिया देखील होऊ शकते.

ॲनाफिलेक्सिस ही आपत्कालीन स्थिती आहे. दूध पिल्यानंतर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच लक्षणे दिसू शकतात.

डेअरी ऍलर्जीचे लक्षणे

डेअरी अॅलर्जीची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे दिसतात. ज्यांना या प्रकारची अॅलर्जी आहे त्यांनी दूध आणि त्यासंबंधित इतर पदार्थांचे सेवन टाळावे. दुधाच्या ऍलर्जीमुळे, तुम्हाला अंगावर पित्ताच्या गाठी, घरघर, खाज सुटणे किंवा ओठ किंवा तोंडाभोवती मुंग्या येणे, जीभ किंवा घसा सुजणे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणे आणि उलट्या होऊ शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते काही लोकांमध्ये या अॅलर्जीमुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, चिंचपोकळीचा चिंतामणीही मार्गस्थ

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 30 सेंमीने उघडले गेले आहेत

SCROLL FOR NEXT