dengue  esakal
आरोग्य

Nanded : धोकादायक! डेंगीचे प्रमाण वाढले.. नागरिकांनी बचावासाठी हे करावे

डेंगी हा विषाणुजन्य आजार हा विषाणुजन्य आजार

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : डेंगी हा विषाणुजन्य आजार असून, तो इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे प्रसारित केला जातो. डेंगी होऊ नये म्हणून मच्छरांची उत्पत्ती टाळणे व त्यासाठी घर, अंगण, परिसरात स्वच्छता बाळगणे सर्वात महत्त्वाचे आहे. डेंगी झाल्यानंतर मात्र, अंगावर न काढता, लक्षणे दिसताच तज्ज्ञांना दाखवून वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये डेंगू होण्याचे प्रमाण अधिक आढळून येत आहे.

डेंगी हा व्हायरल आजार असल्याने त्यावर प्रामुख्याने उपचार होत नाहीत. मात्र, या आजारात ८० टक्के रुग्ण बरे होतात. त्याकरिता योग्य आहार घेणे, हायड्रेशन करिता भरपूर पाणी पिणे व घरीच प्रयोग करून अंगावर न काढता लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते शक्यतोवर डेंगीची मादी डास दिवसा चावतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना लवकर बाधा होते. मुलांमध्ये डेंगीचे प्रमाण अधिक आढळते. ग्रामीण भागात डेंगीचे रुग्ण जास्त दिसून येतात. कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये डेंगी होण्याचे प्रमाण अधिक आढळून येते. त्यामुळे कार्यालयात स्वच्छता बाळगत डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

बचावासाठी हे करावे

डेंगीचे चार फिनोटाईप असून, दुसरा प्रकारचा टाईप सर्वाधिक धोकादायक असतो. त्यामध्ये पुन्हा इन्फेक्शन होऊन कॉम्पि्लेकेशन वाढतात, त्याला शॉक सिंड्रोम म्हटले जाते. यामध्ये लिव्हरवर, किडनीवर सूज येते. रक्त पातळ होते. डोळ्यामध्ये हिमोरेजेस होतात. घर, अंगण, परिसरात पाणी साचू न देता स्वच्छता बाळगून डासांती उत्पत्ती टाळल्यास डेंगी होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.

ही आहेत लक्षणे...

डेंगी झाल्यानंतर तीव्र ताप येतो, थंडी वाजते.

मळमळ होणे, उलट्या होतात.

प्लेटलेट कमी होतात.

हातपाय, डोके दुखणे.

अंगावर पुरळ येणे.

डेंगी झाल्याची लक्षणे दिसल्यानंतरही रुग्ण घरीच प्रयोग करून अंगावर काढतात आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स वाढून आजाराची तीव्रता जास्त होतो. त्यामुळे रुग्णांनी लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे उचित ठरते.

- डॉ. अमोल देशमुख, किडनी तज्ज्ञ

रोग प्रतिकारक शक्तीवर डेंगी आजाराची लागण, तीव्रता अवलंबून असते. लहान मुलांमध्ये डेंगी झाल्यानंतर कॉम्प्लिकेशन्सचे प्रमाण अधिक राहते. डेंगी विषाणूजन्य असला तरी इडिस इजिप्ती डासाच्या चावण्यामुळे पसरतो. डेंगीच्या रुग्णाचे रक्त इतरांना दिल्यास किंवा आईपासून बाळाला तो होऊ शकतो.

- डॉ. प्रमोद पाटील, बालरोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT