Dipika Kakkar Diagnosed With Liver Cancer | 3 Cooking Styles Can Be The Cause sakal
आरोग्य

Deepika Kakkar’s Liver Cancer: जेवण बनवण्याच्या पद्धतीच बेततात जीवावर? दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सर; जाणून घ्या कारणे

How Cooking Methods Can Cause Liver Cancer: चुकीच्या स्वयंपाक पद्धतीमुळे होऊ शकतो लिव्हर कॅन्सर; दीपिका कक्करचा आजार म्हणजे गंभीर इशारा!

Anushka Tapshalkar

Is Grilled Food Bad For Liver Health: आपले अन्न आपले औषध असावे, असे नेहमी म्हटले जाते. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात अन्न कसे शिजवले जाते, याकडे कोणाचेच लक्ष नाही. याच दुर्लक्षामुळे काही जण लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना सामोरे जात आहेत.

'ससुराल सिमर का' फेम आणि बिग बॉस सीझन १२ची विजेती टीवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर हिला स्टेज 2 चा लिव्हर कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला तिला पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवत होत्या. तपासणीनंतर तिच्या लिव्हरमध्ये ट्युमर असल्याचं समजलं, आणि पुढे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये तिला दुसऱ्या टप्प्याचा लिव्हर कॅन्सर असल्याचं निदान झालं. याबाबत दीपिकाने स्वतः सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

महिलांमध्ये लिव्हर कॅन्सर होण्याची कारणे आणि प्रकार पुरुषांपोक्षा काही प्रमाणात वेगळे असले तरी जीवनशैलीतील काही सवयी याला कारणीभूत ठरू शकतात. जसे की व्यायाम, योग्य आहारासोबतच जेवण बनवण्याच्या विशिष्ट पद्धती. होय. जेवण बनवण्याच्या काही पद्धती लिव्हर कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतात. या पद्धती कोणत्या ते पुढे जाणून घेऊया.

लिव्हर

आपल्या शरीरात लिव्हर हे एक महत्त्वाचा अवयव आहे. हे विषारी घटक फिल्टर करते, अन्नाचे रूपांतर उर्जेमध्ये करते, आणि शरीरासाठी आवश्यक बाईल तयार करते. पण जर त्याच्यावर सतत ताण दिला गेला, जसे की चुकीच्या आहारातून, अल्कोहोलमधून किंवा गरजेपेक्षा जास्त तापमानावर शिजवलेल्या पदार्थांमधून तर त्याचा परिणाम कॅन्सरसारखा गंभीर ठरू शकतो.

या ‘तीन’ आधुनिक जेवण बनवण्याच्या पद्धती ठरू शकतात घातक

स्वयंपाक करताना अनेकांना ग्रिलिंग, पॅन फ्रायिंग आणि बार्बेक्यूसारख्या झटपट आणि चविष्ट वाटणाऱ्या पद्धती आवडतात. पण या पद्धतींमध्ये, विशेषतः मांस किंवा बटाट्यासारखे स्टार्च असलेले अन्न खूप उष्णतेवर शिजवले जाते. अशा वेळी अन्नामध्ये काही घातक रसायने जसे की PAHs, HCAs आणि अ‍ॅक्रिलामाइड हे तयार होऊ शकतात. ही रसायने शरीरात जाऊन पेशींना नुकसान पोहोचवतात आणि त्यामुळे कधी कधी कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

शरीरात साचतेय सूक्ष्म पण विषारी घाण

या विषारी घटकांचे प्रमाण जसजसे वाढते, तसतसे लिव्हरचे काम मंदावू लागते. शरीर थकायला लागते, त्वचेचा रंग बदलतो, पचन बिघडते आणि एकूणच आरोग्य ढासळायला लागते. रक्तामार्फत ही रसायने संपूर्ण शरीरात पोहोचू शकतात.

लिव्हर वाचवण्यासाठी काय कराल ?

- शक्यतो अन्न मध्यम आचेवर शिजवा

- ताजे आणि नैसर्गिक अन्न निवडा

- बेकिंग, उकडणे किंवा प्रेशर कुकरचा वापर करा

- रेडी-टू-कुक, प्रोसेस्ड मीट आणि फास्टफूडपासून अंतर ठेवा

- मद्यपान आणि धूम्रपान टाळा

- शरीराची नियमित तपासणी करून यकृताची स्थिती जाणून घ्या

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Durga Visarjan Tragedy : दसऱ्याच्या उत्सवाला गालबोट, दुर्गादेवीचे विसर्जन करताना ६ तरुण बुडाले, दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ

Georai News : गेवराईच्या नदीकाठावरील त्या पूरग्रस्तांना चिखलातच दसरा साजरा करण्याची आली वेळ; चिखलाच्या खचाने साफसफाई करण्यासाठी कमी पडला अवधी

Latest Marathi News Live Update : तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार

Thane News: खबरदार! टिळा आणि बांगड्या घालून याल तर...; खासगी शाळेचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

SCROLL FOR NEXT