Dengue Home Precautions esakal
आरोग्य

Dengue Home Precautions : डेंग्यूच्या उपचारांसोबतच घ्या 'ही' खबरदारी, तुम्ही लवकरच व्हाल तंदुरूस्त अन् निरोगी.!

Dengue Home Precautions : डेंग्यूचा संसर्ग झाल्यास रूग्णांनी त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे महत्वाचे आहे. परंतु, यासोबतच काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Dengue Home Precautions : देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही पावसाने थैमान घातले असून, अनेक भागांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस झिका व्हायरस, डेंग्यू आणि टायफॉईडचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे, आपण सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादूर्भाव अधिक प्रमाणात होतो. डेंग्यूचा डास चावल्याने त्याचा विषाणू हा थेट आपल्या शरीरातील रक्तात प्रवेश करतो आणि रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरतो. डेंग्यूचा संसर्ग झाल्यास रूग्णांनी त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे. परंतु, यासोबतच काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

डेंग्यूमुळे उद्भवणाऱ्या समस्या

जेव्हा एखाद्या व्यक्तीला डेंग्यूची लागण होते तेव्हा अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. ज्यामध्ये, तीव्र ताप, उलट्या, अंगाचा थरकाप होणे आणि अशक्तपणा अशी गंभीर लक्षणे दिसून येतात. डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या देखील कमी होते. त्यामुळे, अनेक समस्या सुरू होतात. अशा स्थितीमध्ये रूग्णाने डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार घ्यायला हवेत आणि खालील गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी.

डेंग्यूमध्ये 'या' गोष्टींची घ्या खबरदारी

आराम करायलाच हवा

डेंग्यूमध्ये रूग्णाला तीव्र ताप येतो. अशा स्थितीमध्ये ताप आल्याने शरीरात खूप अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे, या काळात शरीराला विश्रांती देणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला तीव्र ताप आल्यास, डॉक्टरांकडील गोळ्यांसोबतच शक्य तितके पाणी प्या आणि स्वत:ला हायड्रेट ठेवा.

वेळेवर औषधे घ्या

डेंग्यूच्या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी रूग्णाने वेळेवर औषधे घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे, चुकूनही औषधांचा डोस घ्यायला विसरू नका. तुम्हाला आणखी काही त्रास होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुमच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा

डेंग्यूचा आजार हा डासामुळे होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये आपल्या घरात आणि घराच्या आसपास स्वच्छता जरूर ठेवा. या परिस्थितीमध्ये तुमच्या घरात किंवा घराच्या जवळपास अजिबात पाणी साचू देऊ नका. कचरा साचू देऊ नका. डासांना दूर पळवण्यासाठी फवारणी, मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करा.

प्रथिनांची पातळी महत्वाची

डेंग्यूमुळे शरीरात अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे, या काळात रूग्णाने आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनांचा पुरेसा वापर करणे महत्वाचे आहे. तुम्ही कडधान्ये, मासे, अंडी, चिकन आणि दुधाचा आहारात समावेश करू शकता. यामुळे, डेंग्यूशी लढण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT