Diabetes
Diabetes  google
आरोग्य

Diabetes : रक्तातील साखर जलद गतीने वाढणे ठरेल धोकादायक; ही काळजी घ्या

नमिता धुरी

मुंबई : मधुमेहावरील उपचारांमध्ये, आहार, जीवनशैलीतील बदल आणि औषधे यांच्यामार्फत रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वसाधारण रेन्जमध्ये राहावे यावर लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे हृदयविकारांचा धोका वाढणे, मज्जातंतूंचे नुकसान, किडनीचे आजार, डायबेटिक रेटिनोपॅथी, जखमा बऱ्या न होणे अशा दीर्घकालीन गुंतागुंती टाळता येतात.

प्रत्येक व्यक्तीची स्थिती जशी आहे त्याप्रमाणे डॉक्टर नीट निरीक्षण करून रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यक तितक्या रेंजमध्ये राहील यासाठी प्रयत्न करतात. रक्तातील साखरेचे प्रमाण घरच्या घरी मोजता येईल अशी किट्स आता सर्वत्र सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे मधुमेही व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे अधिकाधिक सोपे बनत आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण कधी मोजावे आणि त्यासाठीची आवश्यक रेंज किती असली पाहिजे याचा सल्ला डॉक्टर देतात. पण काहीवेळा अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे रक्तातील साखर सर्वसाधारण रेंजपेक्षा वाढू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे या स्थितीला हायपरग्लायसेमिया म्हणतात.

आजारपण, ताणतणाव, अति खाणे आणि औषधे वेळेवर किंवा अजिबात न घेणे अशी अनेक कारणे असू शकतात. थकवा येणे, खूप जास्त तहान लागणे, दृष्टी अधू होणे आणि वारंवार लघवीला जावे लागणे ही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असल्याची लक्षणे आहेत. हीच स्थिती खूप काळ तशीच राहिली तर त्या व्यक्तीला वर नमूद करण्यात आलेल्या तब्येतीच्या समस्या होऊ शकतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने थोड्या कालावधीमध्ये डायबेटिक किटोऍसिडोसिस होऊ शकतो. टाईप १ डायबेटीस किंवा टाईप २ डायबेटीसशी संबंधित, थोड्या कालावधीमध्ये होणारी गुंतागुंत हायपरग्लायसेमिक स्थितीमध्ये हे होण्याची शक्यता खूप जास्त असते. या दोन्ही स्थिती गंभीर असतात आणि त्यामुळे ती व्यक्ती कोमामध्ये जाण्याची, झटका येण्याची आणि मृत्यू देखील ओढवण्याची शक्यता असते.

डायबेटिक किटोऍसिडोसिससाठीच्या तपासणीमध्ये किटोन्ससाठी लघवीची तपासणी केली जाते. जेव्हा शरीरात ऊर्जा मिळवण्यासाठी चरबी वापरली जाते तेव्हा किटोन्स रसायने यकृतामध्ये तयार होतात. मधुमेही व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनची कमतरता असल्याने ऊर्जेसाठी साखर वापरता येत नाही आणि शरीर चरबीवर खूप जास्त अवलंबून राहते, शरीरात किटोन्सचे प्रमाण वाढते. यामुळे डायबेटिक किटोऍसिडोसिस होऊ शकतो, असे झाल्यास व्यक्तीला रुग्णालयात भरती करावे लागू शकते आणि ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

रक्तातील साखर जलद गतीने कमी कशी करता येईल याविषयी सांगत आहेत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या कन्सल्टन्ट, एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉ. अर्चना जुनेजा.

काही स्रोतांचा असा दावा आहे की, प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांवर भरपूर पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण जलद गतीने कमी होण्यात मदत होते. पण हे खरे असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. डॉक्टरशी तातडीने संपर्क साधणे खूप गरजेचे आहे. एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जलद गतीने कमी करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतींचा वापर करू शकता.

तुमची औषधे नियमितपणे घ्या.

औषधांचा एकही डोस चुकवू नका. जर तुम्हाला इन्सुलिन घेण्याचा सल्ला दिला आहे तर किती इन्सुलिन घ्यायचे आहे हे तुमच्या डॉक्टरकडून समजून घ्या इन्सुलिन घेतल्यानंतर ३० ते ६० मिनिटांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासा, यामुळे तुम्हाला समजून येऊ शकेल की रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होत आहे की नाही आणि ते खूप जास्त कमी होत नाही यावर देखील तुम्ही लक्ष ठेवू शकाल.

व्यायाम:

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे व्यायाम. चालणे हा एक चांगला व्यायाम आहे. पण व्यायाम नियमितपणे करणे आवश्यक आहे. जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण २४० एमजी/डीएल पेक्षा जास्त असेल तर किटोन्ससाठी लघवीची तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. जर किटोन्स असतील तर व्यायाम करणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर अजून जास्त वाढू शकते.

दिनचर्येमध्ये नियमित व्यायामाचा समावेश केल्याने तुम्ही तुमचे वजन योग्य राखू शकाल आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढवू शकाल. व्यायाम करत असताना कार्यरत राहण्यासाठी शरीराला शर्करेची आवश्यकता असते. स्नायूंना रक्तातून शर्करा मिळते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

रुग्णालयात जा.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने एखादी वैद्यकीय आणीबाणी पटकन निर्माण होऊ शकते. गोंधळ होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, खूप जास्त तहान लागणे, मळमळणे, पोटदुखी आणि उलट्या होणे अशी डायबेटिक किटोऍसिडोसिसची लक्षणे जाणवत असल्यास , लघवीची तपासणी करून किटोन्सचे प्रमाण तपासून घ्या (डीपस्टिक टेस्ट वापरून घरच्या घरी लघवीची तपासणी तुम्ही करून घेऊ शकता) आणि रुग्णालयात जा.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असल्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. रक्तातील साखर ३०० किंवा त्यापेक्षा जास्त असल्याची सलग दोन रीडिंग्स आली तर तातडीने डॉक्टरकडे जा.

आजार ओळखू येणे आणि त्याचे निदान यासाठी एक प्रचंड मोठी प्राथमिक देखभाल यंत्रणा आणि त्यानंतर रुग्णाची काळजी घेणे व उपचार करण्यासाठी विविध विषयांमधील डॉक्टरांच्या टीमने एकत्र येऊन काम करण्याला प्रोत्साहन देणारे फुल-टाईम मॉडेल डॉक्टरांसाठी उपलब्ध असेल तर मधुमेही रुग्णाच्या तब्येतीच्या आड येणारे सर्व अडथळे दूर केले जाऊ शकतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणे ही काही जादू नाही. त्यासाठी नियंत्रण आणि शिस्त असणे आवश्यक आहे. तुमची औषधे नियमितपणे घ्या. रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत रहा आणि ते का वाढते किंवा का कमी होते ते समजून घ्या.

जेवण, खाणे नियमितपणे होऊ द्या. आरोग्याला पूरक खाणे खा, अति खाऊ नका किंवा जेवण टाळू नका. साखर असलेली पेये पिऊ नका. अल्कोहोलच्या सेवनावर नियंत्रण ठेवा. धूम्रपान करू नका. जीवनशैली जर निरोगी असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राखले जाऊ शकते आणि तुम्ही निरोगी दीर्घायुष्याचा आनंद घेऊ शकाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : निकालानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'नव्या उर्जेने पुढे जाऊ...'

Mainpuri Lok Sabha Result: पती-पत्नी एकत्र जाणार संसदेत! अखिलेश यांच्या पत्नीचा दोन लाख मतांनी विजय

Lok Sabha Election Result: मोदी सरकारच्या 43 शिलेदारांचं काय झालं? लोकांनी अनेक मंत्र्यांना देखील बसवलं घरी

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Lok Sabha Election Result : मुंबईत 'नोटा'ची ताकद! महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार वगळता इतर उमेदवार फिके

SCROLL FOR NEXT