Diabetes Patients Food esakal
आरोग्य

Diabetes Patients Food: डायबिटीज पेशंट्सनी बटाटा खावा की नाही? वाचा रिसर्चर्सचा सल्ला

डायबिटीज पेशंटसाठी बटाटा फायदेकारी की नुकसानदायक?

सकाळ डिजिटल टीम

Diabetes Health Care: मधूमेहाच्या रूग्णांना कायम त्यांचं अमुक खाल्ल्यास शुगर लेवल वाढणार तर नाही ना अशी भीती लागली असते. त्याअभावी मधूमेहाचे रूग्ण अनेक गोष्टी खाणं टाळतात. बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्ब्स असतात. कार्ब्स शरीरातील शुगर लेवल वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे अनेक रूग्ण बटाटा खाणं टाळतात. मात्र हा गैरसमज किती योग्य किंवा अयोग्य आहे ते जाणून घेऊया.

बटाटा शुगर लेवल वाढवतो काय?

बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शुगर लेव्हलला वाढवणारे कार्ब्स असतात. बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो जे शुगर लेवल वाढण्याचं महत्वाचं कारण आहे. त्यामुळे मधूमेहाच्या रूग्णांना बटाटा खाण्याआधी फार विचार करावा लागतो.

डायबिटीज रूग्ण बटाटा खाऊ शकतात काय?

रिसर्चर्सच्या मते, बटाटा निश्चितच शरीरातील शुगर लेवल वाढवतो. मात्र बटाटा नियंत्रित प्रमाणात खाल्ला गेल्यास शरीरासाठी फायदेकारी ठरतो. बटाटा खातेवेळी फक्त या गोष्टीची काळजी घ्या की मधूमेहाचे रूग्ण असल्यास बटाटा अशा भाज्यांसह खा ज्यात फॅट, प्रोटीन, विटॅमिनचं प्रमाण जास्त असेल. जेणेकरून तुमच्या शरीराचं स्टार्च लेवल नियंत्रणात राहील. मात्र जर तुम्ही जास्त प्रमाणात स्टार्च असलेल्या भाजीसोबत बटाटा खाल्ला तर तुमचं शुगर लेव्हल वाढू शकतं.

असा खा बटाटा

बटाट्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात. बटाटा हा कमी तेलात भाजी बनवत खा. पॅक्ड बटाट्याचे चिप्स खाणे शक्यतो टाळा. डायबिटीजचे रूग्ण दाळ आणि माशांसह बटाटा खाऊ शकतात. (Health News)

बटाटा का खावा?

बटाट्यांमध्ये बरेच पोषक तत्व असतात. मॅग्नेशियम, पोटॅशिअम, फॉस्फरस, आयरन आणि झिंकसारखे पोषक तत्व असल्याने शरीरासाठी ते फायदेशीर असतात. बटाट्यामध्ये अँटीऑक्सिडंटही असतात. हे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT