Diabetes Symptoms esakal
आरोग्य

Diabetes Symptoms: आता डोळे बघूनही ओळखता येणार मधुमेहाचे लक्षण, तज्ज्ञांनी सांगितली पद्धत

नुकतेच नेत्रतज्ज्ञांनी सांगितले की, डायबिटिजचे लक्षणं डोळ्यांत दिसतात.

धनश्री भावसार-बगाडे

Diabetes Symptoms Can Find In Eyes In Marathi :

भारतात मागील काही काळात डायबिटीज रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. डायबिटीजला एक प्रकारचे मेटॅबोलीक डिसऑर्डर मानले जाते. थकवा, अशक्तपणा, जखम लवकर न भरणे असे डायबिटीजचे लक्षणं आहेत. नुकतंच एका नेत्रतज्ज्ञांनी सांगितले आहे की, मधुमेहाची लक्षणं डोळ्यांतही दिसतात.

द मिररच्या वृत्तानुसार नेत्रतज्ज्ञ डॉ. शेन कन्नर सांगतात की, जर कोणाला ब्लड शुगर असेल तर त्याचा परिणाम डोळ्यांवरही होतो. तहान, सुस्ती आणि वजन कमी होण्याबरोबरच डोळ्यांवरूनही मधुमेह ओळखता येऊ शकतो.

हाय ब्लड शुगरचा डोळ्यांवर परिणाम कसा होतो?

डॉ. शेन सांगतात की, हाय ब्लड शुगर झाल्याने व्यक्तीच्या डोळ्याच्या रेटीनातील ब्लड व्हेसल्स बदलू शकतात. यामुळे डोळ्यांच्या टिश्यूजमध्ये सूज येऊ शकते आणि नजर अंधुक होऊ शकते. वाढलेली ब्लड शुगर डोळ्यांच्या लेंसचा आकारपण बदलवू शकते. याच्यावर उपचार झाला नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबतच रेटिनोपॅथी, ग्लूकोमा आणि मोतीबिंदू सारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

मधुमेहाचा डोळ्यांवर काय परिणाम होतो?

डॉ. शेन म्हणातात, इन्सुलिन हे स्वादुपिंडातून सोडले जाणारे हार्मोन आहे जे रक्तातील ग्लुकोजचे विघटन करते आणि पेशींपर्यंत पोहचवते. यामुळे शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते. शरीरात इन्सुलिन बनवण्याची किंवा त्याचा प्रभावीपणे वापर करण्याची क्षमता नसल्यामुळे डोळ्यांच्या मुळांना होणारे नुकसान म्हणजे मधुमेह. जर कोणाला ही समस्या असेल तर त्यांची दृष्टीसुद्धा जाऊ शकते.

ही स्थिती लहान लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकते. मग जास्त ब्लड शुगरमुळे ब्लड फ्लो कमी होऊ शकतो, ज्यामुळे डोळ्यांतील पेशी बंद होऊ शकतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गळती, ऑक्सिजनची कमतरता आणि सूज येऊ शकते.यामुळे मोतीबिंदू होऊ शकतो. ही गळती रेटीनालापण नुकसान पोहचवू शकते. मधुमेहामुळे रक्ताची अधिक गळती होऊन नजरेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही डॉ. शेन यांनी सांगितले.

डोळ्यांत दिसतात हो संकेत

डॉ. शेन म्हणतात जर कोणाला मधुमेह असेल तर त्यांची दृष्टी अंधुक होऊ शकते. दृष्टी खराब होऊन, काळे डॉट्स येऊ शकतात. चमक वाढू शकते किंवा नजरेत होल दिसू शकतात.

डाएट आणि व्यायामाशिवाय ब्लड शुगर कमी कशी करणार?

डॉ. शेन यांच्यानुसार झोप कमी झाल्याने विकास होर्मोन्सचा स्राव कमी होऊन कोर्टिसोलचा स्तर वाढू शकतो. हे दोन्ही ब्लड शुगर मॅनेजमेंटमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे किमान ७ ते ८ तासाची गाढ झोप होणे आवश्यक आहे. स्वतःला हायड्रेटेड ठेवल्याने फक्त आरोग्यच चांगले राहणार नाही तर मधुमेहापासूनही बचाव होऊ शकेल.

शरीर हायड्रेटेड ठेवल्याने किडनी लघवीच्या माध्यमातून अतिरीक्त साखर बाहेर काढून टाकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. ताण कमी घेतल्यानेसुद्धा ब्लड शुगरमध्ये मदत मिळते. त्यामुळे कायम स्ट्रेस फ्री रहण्याचा प्रयत्न करावा.

डोळ्यांत मधुमेहाची लक्षणं कधी दिसतात?

डॉ. शेन म्हणतात जेव्हा तुम्हाला डोळ्यांची समस्या जाणवू लागेल तेव्हा ताबडतोब त्यावर इलाज करणे गजेचे असते. जोवर मधुमेह जास्त वाढत नाही तोवर बऱ्याचवेळा लक्षणं दिसत नाही. तज्ज्ञांचं मानणं आहे की, २० ते ७४ वर्ष वयोगटात दृष्टीहीनतेचे मुख्य कारण मधुमेह आहे.

मधुमेहाची ही लक्षणं दिसताच सावध व्हा

डोकेदुखी, डोळे दुखणे, खुपणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यात चमक येणे ही लक्षणं मधुमेहाची असू शकतात. जर तुम्हाला यापैकी एखादं किंवा जास्त लक्षणं दिसू लागली तर नेत्र तज्ज्ञांकडून डोळे तपासून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT