Diabetic Patient Eye Care esakal
आरोग्य

Diabetic Patient Eye Care : मधुमेह तुमच्या डोळ्यांना करतोय कमजोर, अशी घ्या योग्य काळजी

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या डोळ्यांची योग्य काळजी घ्यायला हवी

सकाळ ऑनलाईन टीम

Eye Care Tips For Diabetic Patient : जगभऱ्यात मधुमेहाच्या समस्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. मधुमेह हा असा आजार आहे ज्याचा मुळातून पराभव करणे शक्य नाही. मात्र त्याला नियंत्रणात ठेवणेही तेवढेच महत्वाचे असते. मधुमेहाचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. विशेषत: डोळ्यांवरही त्याचा परिणाम दिसून येतो. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या डोळ्यांची योग्य काळजी घ्यायला हवी.

मधुमेहाच्या रूग्णांना वेळोवेळी त्यांच्या ब्लड शुगर लेवलकडे लक्ष ठेवायला लागतं. ब्लड शुगर लेव्हल अतिप्रमाणात वाढलं तर तुमच्या डोळ्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. रेटिनोपॅथी, ग्लूकोमा आणि मोतियाबिंदू यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. तेव्हा तुम्ही मधुमेहाचे रूग्ण असाल तर डोळ्यांची विशेष काळजी घ्या. तेव्हा डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांपासून वाचण्यासाठी हे उपाय फॉलो करा.

ब्लड शुगर लेव्हल असे ठेवा कंट्रोलमध्ये

जेव्हा तुमचं ब्लड शुगर लेव्हल हाय होतं तेव्हा तुमच्या डोळ्यांच्या आकारात बदल होतो. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांत धुसर दिसायला लागतं. मात्र त्याच्यावर सोल्युशनही आहे.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी हे उपाय करा

हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल या अशा समस्या आहेत ज्यामुळे तुम्हाला गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Health News)

स्मोकिंग सोडा - धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर डायबिटीक रूग्णांसाठी धूम्रपान करणे तर फारच धोक्याचे ठरते. हा धूर थेट तुमच्या नसांमध्ये जातो. याचा परिणाम तुमच्या दूरदृष्टीवरही होऊ शकतो.

रोज करा ही एक्सरसाईझ - रोज एक्सरसाइझ करणे आरोग्यासाठी फार चांगले असते. एक्सरसाइज केल्याने शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहाते. अशात हे फार महत्वाचं आहे की तुम्ही दररोज 45 मिनीट किंवा 1 तास एक्सरसाइज करावी.

हेल्दी आहार घ्या - हेल्दी गोष्टी खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहातं असं म्हटलं जातं. तेव्हा तुम्ही बॅलेंस डाएट फॉलो करा. जे तुमच्या शरीराला सगळ्याच प्रकारचे पोषक तत्व प्रदान करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातने केली सोलापुरात जमिनीची खरेदी; अतिरिक्त मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे, भूसंपादन प्रक्रियेत घोटाळे?

Breaking News Live Update: नाशिकमधील अत्याचार प्रकरणानंतर नामांकित आयटी कंपनीचे युनिट बंद होणार

Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा विरोध कायम: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गुन्हा नोंदविण्याबाबत राष्ट्रवादीचेही मौन!

IPL 2026: पराभवाची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे मुंबईसमोर आव्हान; वानखेडेवर आज रॉयल चॅलेजर्स बंगळूरशी सामना, कशी असेल प्लेइंग-११

फिनालेपूर्वी 'हा' सदस्य घराबाहेर! बिग बॉसच्या पर्वातलं धक्कादायक Eviction, कोण आहे ती व्यक्ती?

SCROLL FOR NEXT