Dengue, Chikungunya patients esakal
आरोग्य

डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांनी काय खावे? आहारतज्ञ सांगतात की..

तुषार महाले

नाशिक : शहरात पावसाळ्यात साथीच्या आजारांसह डेंगी, चिकूनगुनियाचे रूग्ण वाढले आहे. आरोग्य जपताना रोजचा आहारही आजारांना निमंत्रण ठरतो. बाहेरचे अन्नपदार्थांसह घरातील शिळे अन्न साथीचा आजार होण्यासाठी कारणीभूत ठरतात. साथीच्या आजारांसह डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांनी हिरव्या पालेभाज्यांसह (Vegetables) फळांचा (fruits) समावेश करावा असे आहारतज्‍ज्ञांचे मत आहे.


पावसाळ्यात बाहेरचे अन्नपदार्थासह दूषित पाण्यामुळेही आजारांमुळे वाढ होते. कोरोना अनलॉकनंतर घरातील अन्न खाऊन कंटाळलेल्या नागरिकांनी बाहेरचे अन्नपदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसत असून, बाहेरचे अन्नपदार्थ टाळून घरातील शिजलेले अन्नपदार्थ घ्यावे. डेंगी व चिकूनगुनियाच्या रुग्णांनी आहाराबाबत काळजी घेत प्रथिनयुक्त आहारावर भर देवून हलका आहार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


महिलांनी अशी घ्यावी काळजी

पावसाळ्यात साथीच्या आजारांसह डेंगी, चिकूनगुनिया आजारांमध्ये वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत पुरुषांपेक्षा महिलांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. साथीच्या आजारांसह डेंगी, चिकूनगुनियाच्या रुग्णांनी विशेषतः महिलांनी पपईचा आहारात समावेश करावा. पपईचे सूप पिल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. महिलांना ॲनिमियाचा त्रास जास्त असतो. महिला स्वतःच्या आरोग्यासह आहाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांनी हिमोग्लोबीन सामान्य ठेवण्यासह महिलांनी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करून जीवनसत्त्व ‘क’ व ‘अ’ घ्यावे.


पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ टाळायला हवे. कोरोनाकाळात नागरिकांनी बाहेरचे खाणे टाळले आहे. घराबाहेर राहणाऱ्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळावे, ताजे अन्न खाण्यासह फळांचा आहारात समावेश करावा. पावसाळ्यात पोटाच्या आजारात वाढ होते. आहारात काढ्यांचा उपयोग करावा, मात्र त्याचा अतिरेक करू नये. दिवसातून जास्तीत- जास्त दोन वेळेस काढ्यांचा समावेश करावा. महिलांनी आहारात कच्ची पपईचा समावेश करून क जीवनसत्त्व मिळेल असा आहार घ्यावा.
- रंजिता शर्मा, आहारतज्ज्ञ


शहरात डेंगी व चिकूनगुनियाचे प्रमाण वाढले आहे. अशा रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीरात अशक्तपणा येत असल्यामुळे अतिरिक्त प्रथिन, रोग प्रतिकारशक्तीची गरज असते. रुग्णांनी प्रथिनयुक्त आहारावर भर देवून क जीवनसत्त्वाचा आहारात समावेश करावा. तेलकट पदार्थांचा आहार टाळला तर अनेक आजार टाळता येऊ शकतात.
- डॉ. सुप्रिया गोसावी, आहारतज्‍ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT