eating cashew disadvantages sakal
आरोग्य

Health Tips: काय सांगता? काजू खाण्याचे तोटेही असतात? वाचा सविस्तर

तुम्हाला माहित आहे का की काजूचे जास्त सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

Aishwarya Musale

Disadvantages of Eating Cashew: काजूचे नाव सुक्या मेव्याच्या बाबतीत प्रथम येते. स्वयंपाकघरातील एखाद्या खजिन्यापेक्षा काजू कमी नाही. काजू खाल्ल्याने आपली हाडे मजबूत होतात. तसे काजू खाल्ल्याने त्वचा ही निरोगी राहते. महत्वाची गोष्ट म्हणजे काजूचे जास्त सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

काजुमध्ये अधिक मात्रेत सोडियम आढळतो आणि म्हणून जर आपण प्रमाणापेक्षा जास्त काजूचे सेवन केले तर आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण हे अनावश्यक रित्या वाढू शकते.

यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक तसेच हृदयाशी संबंधित आजार अशा समस्या होतात. काजू पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने ते जास्त प्रमाणात खाणे टाळावे. आरोग्याला काजूच्या अतिसेवनामुळे कोणते तोटे होतात ते तुम्हाला माहिती असायला हवं.

काजू खाण्याचे तोटे

लठ्ठपणा वाढतो

कॅलरीजचे प्रमाण काजूमध्ये जास्त असते. जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा, रक्तातील साखरेची उच्च पातळी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच मधुमेह आणि थायरॉईड असलेल्या रुग्णांनी काजू खाऊ नये. तुम्ही जर आधीच लठ्ठ असाल तर काजू खाणे टाळा.

किडनी स्टोन

काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, म्हणूनच काजूच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला आधीच किडनीची समस्या असेल तर काजू खाणे टाळा.

डिहायड्रेशन होऊ शकते

काजूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच जास्त फायबर खाल्ल्यानंतर कमी पाणी प्यायल्यास डिहायड्रेशन होते.

कारण फायबर व्यवस्थित विरघळण्यासाठी पाण्याची जास्त आवश्यकता असते. शरीरात जेव्हा जास्त फायबर असते तेव्हा ते शरीरात असलेले पाणी शोषून घेते. म्हणूनच बद्धकोष्ठतेसारख्या समस्याही सुरू होतात.

काजूमुळे आपले वजन देखील वाढू शकते. तसे बघायला गेले तर काजू आपल्या शरीरासाठी चांगले असते पण जास्त कॅलरीज आपल्या शरीराचे वजन वाढवु शकतात म्हणून काजूचे प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT