Yoga for Busy Lifestyle | Shatkriya sakal
आरोग्य

Yoga for Busy Lifestyle: धावपळीच्या जीवनात शरीर अन् मनाच्या आरोग्यासाठी ‘षट्क्रिया’ आणि योगाचे अद्भुत लाभ

How Shatkriya helps in cleansing body and mind: षट्क्रिया आणि योगामुळे शरीरशुद्धी, मानसिक शांतता आणि नैसर्गिक आरोग्य टिकवता येते.

सकाळ वृत्तसेवा

Daily Yoga Routine for Internal Detoxification: धावपळीच्या जीवनशैलीत ताणतणाव, रक्तदाब, पचनशक्तीशी निगडित विविध आजार तयार होतात. या आजारांचे मूळ आपल्या जीवनशैलीत दडलेले आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळी, झोपण्याच्या सवयी, शरीराला व्यायाम नसणे, अनावश्‍यक औषधी ग्रहण करणे अशा अनेक सवयींचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. तारुण्यात हा परिणाम दिसून पडत नाही; पण जसजसे वय पस्तीशी ओलांडायला लागते त्याचा प्रभाव जाणवू लागतो. अशा स्थितीत योगोपचार शरीराला अंतर्बाह्य अधिकाधिक बळकट करीत असतो. या शास्त्रात शरीराच्या बरोबरीनेच मनालाही महत्त्व दिले गेले आहे.

योग केवळ शरीरासाठीच नाही, तर मनाच्या स्वास्थ्यासाठीही उपयुक्त आहे. विविध आसने शरीरातील स्नायूंचे कार्य सुरळीत करण्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. योगासने ही नैसर्गिक उपचारपद्धती असल्याने त्याचे दुष्परिणामही जाणवत नाहीत. व्यायामाचे अनेक फायदे आहेत. त्याने अंग हलके होते, काम करण्याचे सामर्थ्य वाढते, भूक वाढते, शरीरातील मेद कमी होतो. शरीर सुगठित, रेखीव आणि कणखर होते, शरीराची वाढ होते. शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, कांती सतेज होते, सर्व अवयव मोकळे होतात, जठराग्नी प्रदिप्त होतो.

शरीराचा आणि मनाचा आळस दूर होतो. शरीर बळकट आणि चपळ होते. श्रम, थकवा, तहान, ऊन आणि थंडी सोसणे शक्‍य होते. व्यायामामुळे उत्तम आरोग्यही प्राप्त होते.

मात्र, आपले वय, शरीर, स्थिती, बल, देश, काल आणि आहार या सगळ्यांचा विचार करून व्यायाम प्रकार निवडावा. ऋतुमानाप्रमाणे व्यायामात बदल करावा. तोंडाने श्‍वास घ्यावा लागणे, घशाला कोरड पडणे, कपाळ, नाक येथे घाम येणे ही यथाशक्ती व्यायाम झाल्याची लक्षणे आहेत.

आयुर्वेदातील पंचकर्माप्रमाणे योगशास्त्रातही शरीरशुद्धीचा उल्लेख आहे. बाह्य आणि आंतरशुद्धीसाठी योगशास्त्रात "षट्‌कर्माचा उपयोग केला जातो. या पद्धतीचे हठ प्रदीपिकेत वर्णन आहे.

धौती, बस्ती, नेती, त्राटक, नैली, कपालभाती अशा या षट्क्रिया आहेत. या षट्क्रियांमुळे आणि प्राणायामाद्वारे शरीरातील 72,000 नाड्यांची शुद्धी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरून वाद! थेट सरकारला 48 तासांची नोटीस, 46 लाख दंड वसूल करण्याची मागणी

Supreme Court : श्वानप्रेमींसाठी दिलासादायक बातमी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, 'त्या' आदेशावर पुनर्विचार करण्याची...

सात वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट, पीडित कुटुंबाला धमकावणाऱ्या चौघांना अटक....मुख्य आरोपी अद्यापही फरार

गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, ३२ वर्षीय डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू; एक जण गंभीर जखमी, कारचा चुराडा

SCROLL FOR NEXT