Diwali Faral esakal
आरोग्य

Diwali Faral : फराळ खाताय ,मग वेळ पाळायलाच हवी!

विविध गोड पदार्थ खाण्याची विशेष मौज या काळात असते

सकाळ डिजिटल टीम

Diwali Faral : दिवाळी हा आनंदोत्सवाचा सण. विविध गोड पदार्थ खाण्याची विशेष मौज या काळात असते. मात्र याच काळात आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. दिवाळीत पारंपरिक पद्धतीने मिठाई घरी तयार करण्याऐवजी बाहरून मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. पण हे पपद्रमाण कमी करून दिवाळीला गोड खारे पदार्थ घरीच तयार करावे. आणि विशेष म्हणजे हे पदार्थ खाताना वेळा पाळल्यास यातून आनंदही मिळेल आणि सोबतच आरोग्यही राखता येईल, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. tips

पदार्थ खाताना असे असावे वेळापत्रक

शक्करपाळ्यासारखा पदार्थ सकाळी नाश्त्याच्या वेळी तसेच सकाळी ११ वाजता किंवा ४ च्या चहाच्या वेळी खाऊ शकता. लाडू किंवा बर्फीसारखे गोड पदार्थही सकाळी खाण चांगले. खीर किंवा हलवा यांसारखे पदार्थ दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात खायला हवेत. दिवाळीच्या काळात एक ताजे स्वीट आणि मधल्या वेळेत खाल्ला जाणारा एक फराळाचा पदार्थ असे दोन भाग करा.

आरोग्यदायी गोड पदार्थ

कणकीचा, पोह्याचा, नाचणीचा व बेसन-रवा लाडू हे रुचकर व पौष्टिकही आहेत. सुक्या मेव्याचे लाडू तयार करताना साखरेऐवजी खजूर वापरावे. मिठाईत अंजीर, सुकामेवा, खजूर, मनुका वापरावा. गुळाचा वापर चांगला उपाय आहे. गोड शक्कर पाळे करताना मैदाऐवजी कणिक, गूळ, तांदळाचे पीठ यांचा वापर करा. करंजी करताना रवा आणि तांदळाचे पीठ वापरा.

खारे पदार्थ असतात आरोग्यदायी

चकली पौष्टिक असते. ती तयार करताना त्यात चन्ना डाळ, मूग डाळ, उडिद, तांदूळ, ज्वारीचा वापर करावा. भरडधान्य असलेल्या मूग, ज्वारी, बाजरी आणि नाचणीचा वापर करून खुसखुशीत चकली तयार करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT