eye care
eye care google
आरोग्य

Diwali health : फटाके फोडताय ? डोळ्यांना होऊ शकते गंभीर दुखापत; अशी घ्या काळजी

नमिता धुरी

मुंबई : दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी वयाची मर्यादा निश्चितच नसते आणि आतषबाजी तर सर्वांनाच आवडते. फटाके हाताळताना अतिरिक्त काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

दिवाळीच्या काळात फटाक्यांनी होणाऱ्या बहुतेक दुखापतींचा डोळ्यांवर थेट परिणाम होतो, फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापती होतात. डोळ्यांना होणाऱ्या दुखापती दरवर्षी मोठ्या संख्येने नोंदवल्या जातात आणि त्या प्रामुख्याने फटाक्यांमुळे होतात.

हात व बोटे यांच्या खालोखाल फटाक्यांचा परिणाम डोळ्यांवरच होतो. फुलबाज्या आणि बॉम्बमुळे बहुतेक दुखापती होतात, तर चक्रांमुळेही काही दुखापती होतात. त्यामुळे दिवाळीत डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे सांगत आहेत डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल्स वर्ल्डवाइड आणि आदित्यज्योत आय हॉस्पिटलच्या व्हायट्रो रेटिनल सेवेचे प्रमुख प्राध्यापक डॉ. एस. नटराजन.

अधिक धोका असलेल्या व्यक्ती

डोळ्याला दुखापत होण्याचा धोका फटाके हाताळणाऱ्यांबरोबरच तेथे नुसत्या उभ्या असलेल्या 50 टक्क्यांहून अधिक लोकांनाही असतो. त्याचबरोबर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनाही रस्त्यावर वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे दुखापतींचा धोका असतो.

दुखापतीचा प्रकार

नेत्र दुखापतींची तीव्रता सौम्य चुरचुर व नेत्रपटलावर ओरखडा उमटण्यापासून रेटिनाला होणारे गुंतागुंतीचे आजार व अंधत्वाची शक्यता असलेल्या ओपन ग्लोब दुखापतीपर्यंत अशू शकते. फटाक्यांमध्ये मिसळलेल्या गन पावडरमधील रसायनांमुळेही डोळ्यांना दुखापती होतात. सातत्याने धूर येत ऱाहिल्यामुळे डोळे चुरचुरतात आणि त्यातून पाणी येते.

फटाक्यांतून येणाऱ्या धुरामुळे लॅरिंजायटिस व अन्य काही प्रकारचे प्रादुर्भाव घशामध्ये होतात. फटाके धोकादायक असतात, कारण, ते सोन्याचे ज्वलन करण्याइतपत उच्च तापमानावर (1,800° F) जातात. हे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमानाहून सुमारे 1,000 अंशांनी अधिक असते, या तापमानात काच वितळते आणि त्वचा तिसऱ्या स्तरापर्यंत (थर्ड डिग्री) भाजून निघू शकते. अशा प्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

बहुतेक फटाक्यांमध्ये गन पावडर असते, त्यामुळेच फटाक्यांचा स्फोट होतो. फटाक्यांचे स्फोट बेभरवशाचे असल्यामुळे अगदी काळजी घेऊन किंवा देखरेखीखाली फटाके उडवणाऱ्यांनाही दुखापती होऊ शकतात.

दिवाळीच्या काळात प्रदूषणाचा स्तर कळस गाठतो, हवेतील नायट्रोज ऑक्साइड आणि सल्फर डायॉक्साइडची पातळी लक्षणीयरित्या वाढते.

ध्वनीप्रदूषणाचे स्तरही परवानगी घालून दिलेल्या मर्यादांहून बरेच वर जातात. झाडे आणि फुटणारे फटाके यांमध्ये अनेक सुक्ष्म घटक असतात. ते वेगाने पसरतात व उतींचे यांत्रिक स्वरूपाचे नुकसान करतात.

काँटॅक्ट लेन्सेस दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात आल्यास डोळ्यांची चुरचुर होऊ शकते. त्यामुळे काँटॅक्ट लेन्सेस वापरणाऱ्यांनी फटाके वाजवताना दुप्पट काळजी घेणे आवश्यक आहे. थोडक्यात, फटाक्यामुळे डोळ्यांचे होणारे नुकसान हे फटाक्याचा वेग किंवा त्यांची डोळ्यावर आदळण्याची तीव्रता, डोळ्याशी होणारी रासायनिक प्रक्रिया व उष्णतेमुळे किती प्रमाणात भाजले गेले आहे यांवर अवलंबून असते.

डोळ्यांना होणाऱ्या प्रमुख दुखापती

▪ ओपन ग्लोब दुखापत- ही आय वॉल अर्थात नेत्र भित्तिकेला होणारी ‘फुल थिकनेस’ दुखापत असते.

▪ क्लोज्ड ग्लोब दुखापत – ही नेत्र भित्तिकेच्या संपूर्ण जाडीला छेद न जाता/ती न फुटता झालेली दुखापत असते.

▪ जळजळ- डोळ्याभवती खरचटणे

▪ लॅमेलर लॅक्रिएशन- नेत्र भित्तिकेच्या जाडीवर अंशत: परिणाम करणारी जखम

▪ लॅक्रिएशन- टोकदार घटकामुळे नेत्र भित्तिकेच्या संपूर्ण जाडीला होणारी दुखापत

▪ पेनिट्रेटिंग (खोलवर) दुखापत- ही ‘एण्ट्रन्स वुंड’सह झालेली ओपन ग्लोब दुखापत असते.

▪ छिद्रित दुखापत- ही एण्ट्रस्ट व एग्झिट प्रकारच्या दुखापतींसह झालेली ओपन ग्लोब दुखापत असते.

क्लोज आय प्रकारच्या दुखापती झालेल्या रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार दिले जातात, तर ओपन आय प्रकारच्या दुखापती, कॉर्निया व स्क्लेरल फाटून झालेल्या दुखापती, हायफेमामुळे (डोळ्याच्या आतील कप्प्यांमध्ये रक्त साचणे) होणारा इरिडोडालिसिस, डोळ्याच्या आतमध्ये बाह्यघटक गेल्यामुळे होऊ शकणारी दुखापत ((IOFB) आणि ग्लोब फुटणे यांसारख्या दुखापतींसाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेणे आवश्यक ठरते. रुग्णालयात दाखल करून घेऊन रुग्णाचे निरीक्षण व पुढील व्यवस्थापन केले जाते.

हे करा आणि हे करू नका

■ डोळे चोळू नका किंवा त्यावर ओरखडे येऊ देऊ नका.

■ डोळे आणि चेहरा व्यवस्थित धुवा.

■ डोळ्यांची चुरचुर होत असेल किंवा काही बाह्यघटक डोळ्यात गेला असेल, तर पापण्या पूर्ण उघडून धरा आणि डोळ्यांवर वारंवार पाण्याचे शिपके द्या.

■ बाह्यघटक मोठा असेल किंवा डोळ्यात चिकटला असेल, तर तो काढण्याचा प्रयत्न करू नका.

■ डोळे मिटलेले ठेवा आणि नेत्रविकारतज्ज्ञांकडे जा.

■ डोळ्यात कोणतेही रसायन गेले असेल, तर तत्काळ डोळे व पापण्यांभवतीचा भाग पाण्याने ओला करा आणि 30 मिनिटे पाणी लावत राहा. तत्काळ नेत्रविकारतज्ज्ञांना दाखवा.

लहान मुलांबाबत - हे करा आणि हे करू नका

▪ दुखापत झालेला डोळा चोळू नका. त्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो किंवा दुखापत आणखी तीव्र होऊ शकते.

▪ दुखापतग्रस्त डोळ्यावर कोणताही दाब देऊ नका. अशा परिस्थितीत फोम कप किंवा ज्यूसच्या कार्टनचा तळ डोळ्यावर धरणे किंवा बांधणे या दोनच गोष्टी केल्या जाऊ शकतात.

▪ वेदनाशामकांसह कोणतीही ओटीसी औषधे देऊ नका.

▪ कोणतेही ऑइंटमेंट लावू नका. त्यामुळे डॉक्टरांना डोळा तपासणे व दुखापतीबाबत निदान करणे कठीण होऊन बसते.

▪ मुलांना मार्गदर्शन किंवा देखरेखीखालीही फटाक्यांशी खेळण्याची परवानगी देऊ नका.

सावधगिरी बाळगा

■ फटाके नेहमी मोकळ्या जागेत वाजवा, गॉगल्स घाला, स्वच्छ पाण्याने हात धुवा.

■ लहान मुले फटाके वाजवत असताना मोठ्यांनी लक्ष द्यावे. कोणतीही दुखापत सहजपणे घेऊ नका; डॉक्टरांना दाखवा व प्रोफेशनल मदत घ्या.

■ अपघाताने आग लागल्यास पाण्याने भरलेली बादली व वाळू लगेच सापडेल अशा ठिकाणी सज्ज ठेवा.

■ फटाके सुरक्षित जागी बंद खोक्यात आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत असे ठेवा.

■ फटाके चेहरा, केस व कपड्यांपासून दूर ठेवा.

■ फटाके वाजवताना कृत्रिम धाग्यांपासून (सिंथेटिक) तयार केलेले कपडे घालू नका.

■ फटाके वाजवताना ते किमान हातभर लांब राहतील याची काळजी घ्या आणि फटाके वाजताना बघायला उभे राहताना किमान पाच मीटर्सचे अंतर ठेवा.

■ फटाके वाजवण्यासाठी जाताना काँटॅक्ट लेन्सेस काढून ठेवा. त्याऐवजी चष्मा वापरा. चष्म्याने तुमच्या डोळ्यांचे संरक्षणही अधिक चांगल्या प्रकारे होईल.

■ फटाक्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते पाण्याने भरलेल्या बादलीत घालून निष्क्रिय करा.

■ जळलेले फटाके अपघाताने पायाखाली येऊन जखम होऊ नये म्हणून नेहमीच उत्तम पादत्राणे वापरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT