Eating  sakal
आरोग्य

Healthy Eating Habits: जेवताना या चुका करू नका, नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

आपल्या शरीराच्या पोषणासाठी चांगलं जेवण अतिशय गरजेचं आहे.

Aishwarya Musale

आपल्या शरीराच्या पोषणासाठी चांगलं जेवण अतिशय गरजेचं आहे. मात्र जेवण करताना आपण अनेकदा अशा काही चुका करतो ज्यामुळे त्या अन्नाचा पुरेपूर  मिळत नाही. शिवाय त्यातून आपलं आरोग्यही बिघडू शकतं. हेल्दी डायट घेणं गरजेचं आहेच. पण त्यासोबतच हे नियमही पाळलेच पाहिजेत

आपण दिवसातून नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असे कमीत कमी तीन वेळा खातो. खाल्याने शरीराला उर्जा मिळते. पण याकाळात आपण अशा काही चुका करतो की त्याचा विपरीत परिणाम आपल्याला भोगावा लागतो. नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण याच्या वेळा ठरलेल्या असाव्या. पण यात सारखा बदल झाल्याने त्रास होतो.

जेवताना कोणत्या ४ चुका केल्या जातात

१) जेवणाआधी दही खाणे - दही हे मुळात थंड असते. त्यामुळेच ते पचनास मदत करते असे मानले जाते. म्हणून ते जेवणापूर्वी खाऊ नये. कारण ते पोटातली आम्लता कमी करते. दही नेहमी जेवणानंतर खावे. यामुळे प्रोटीन वाढते व मसल्स डेव्हलप होतात.

२) डिनरमध्ये भात खाणे- भात रोजच्या जेवणातला महत्वाचा भाग आसतो. भात कार्बोहायड्रेट्सचा रीच सोर्स आहे. त्यामुळे याला पचायला वेळ लागतो. यातील हाय कॅलरीज वजन वाढण्यास कारणीभूत होतात.

३) जास्त गरम दूध पिणे - दूधाला कंप्लीट फूड समजले जाते कारण यात साधारणपणे सगळेच न्यूट्रीयंट असतात. पण जास्त गरम दूध प्यायल्याने पचायला जड जाते. कोमट दूधाने काही त्रास होत नाही.

४) रिकाम्या पोटी केळं खाणे - केळं आरोग्यासाठी खूप लाभदायक असले तरी याला योग्य वेळेत नाही खाल्ले तर त्याचे दूष्परिणाम भोगावे लागतात. केळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये यामुळे एनर्जी संपते शिवाय डायरिया इंटेस्टाइनल सिंड्रोम सारखे त्रास होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT