Obesity esakal
आरोग्य

Obesity : लठ्ठपणावर शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे की नाही? वैद्यकीय तज्ज्ञांनी यावर केलाय अभ्‍यास

मुंबईसह देशातील आघाडीच्या बॅरियाट्रिक सर्जन्सनी लठ्ठपणाबाबत अनोखे सर्वेक्षण केले आहे

साक्षी राऊत

Obesity : आता लठ्ठपणाने ग्रस्त नागरिकांना शस्त्रक्रियेची गरज आहे की नाही ते आजारांच्या मूल्‍यांकनावरून ठरवता येणार आहे. बॅरियाट्रिक सर्जन्स या दिशेने पावले उचलत आहेत. कोणाला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे हे निर्धारित करण्यासाठी ते मूल्‍यांकन ठरवत आहेत. आतापर्यंत हे मूल्यमापन शरीराची उंची आणि वजनाच्या आधारे करत होते, पण आता त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांचा समावेश करण्यावर बेरियाट्रिक सर्जनने भर दिला आहे. या आधारावर एका सर्वेक्षणात मूल्यांकन ठरवले आहे.

मुंबईसह देशातील आघाडीच्या बॅरियाट्रिक सर्जन्सनी लठ्ठपणाबाबत अनोखे सर्वेक्षण केले आहे. लठ्ठपणाने त्रस्त १,०४६ रुग्णांचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्‍याच्‍यांवर आता आजारांच्या मूल्‍यांकनावरून अभ्यास करून शस्‍त्रक्रियेची गरज आहे की नाही हे ठरवण्यात येणार आहे.

६६ टक्के लोकांना शस्त्रक्रियेची गरज

या सर्वेक्षणात १५ ते ९७ वयोगटादरम्यानच्या ६३९ महिला आणि ४०७ पुरुष सहभागी झाले होते. यासाठी ६६.६३ टक्के रुग्णांवर बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेची गरज असल्याचे आढळून आले; याशिवाय ६.९ टक्के रुग्णांसाठी आहार आणि व्यायाम तसेच ४.६ टक्के रुग्णांसाठी फार्माकोथेरपी आवश्यक होती.

लठ्ठपणामुळे होणारे आजार

हृदयरोग

टाईप २ मधुमेह

कर्करोग

स्लीप एपनिया

वंध्यत्व

या तज्‍ज्ञांचा समावेश

मुंबई येथील डॉ. अपर्णा गोविल भास्कर, नवी दिल्लीचे डॉ. अतुल एन. सी. पीटर्स, जालंधरचे डॉ. जी.एस. जम्मू, अहमदाबादचे डॉ. मनीष खेतान, चेन्नईचे डॉ. राज पलानिप्पन, पुण्याचे डॉ. शशांक एस. शाह, बेंगळूरुचे डॉ. शिवराम एच.व्ही. आणि कोईम्बतूरचे डॉ. प्रवीण राज यांनी हे सर्वेक्षण केले आहे.

असे होत आहे मूल्‍यांकन

1 बेरिएट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले, की लठ्ठपणाच्या उपचारांसाठी मूल्यांकनात केवळ वजन आणि बॉडी मास इंडेक्सच (बीएमआय) नाही, तर लठ्ठपणाशी संबंधित आजारांचाही समावेश करणे महत्त्वाचे आहे.

2 वय, बीएमआय, शारीरिक मर्यादा, रोगांची उपस्थिती, जीवनाची गुणवत्ता, मानसिक आरोग्य, अनुवांशिक घटक यांसारख्या जोखीम घटकांच्या विस्तृत श्रेणीचा वापर करून गुण विकसित केले गेले.

नागरिकही करू शकतील मूल्‍यांकन

एक स्कोअर असलेले लोक आहार किंवा औषधांच्या आधारे लठ्ठपणा कमी करू शकतात; तर दोनपेक्षा जास्त स्कोअर असलेल्या व्यक्तीने शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला पाहिजे. या स्कोअरचा वापर करून आरोग्य सेवा संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने तयार केली पाहिजेत, ज्याद्वारे नागरिकदेखील शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या लठ्ठपणाचे मूल्यांकन करू शकतील.

लठ्ठपणाचे प्रमाण वाढणार

भारतातील लठ्ठपणाचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्वेक्षणानुसार २०४० पर्यंत पुरुषांमध्ये ९.५ टक्के आणि महिलांमध्ये १३.९ टक्के प्रमाण होईल, अशी भीती तज्‍ज्ञांनी व्यक्‍त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT