Cholesterol  esakal
आरोग्य

Cholesterol : अंडी खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं? जाणून घ्या सविस्तर

कोलेस्ट्रॉल असलेल्यांनी अंडी खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं काय?

साक्षी राऊत

Cholesterol : बरेचदा नाश्त्यामध्ये उकळलेली अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तसेच त्यात नॅचरल फॅटसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. जगभरात अंडी खाणे हे सामान्य आहे. डॉक्टरसुद्धा हे सूपरफुड खाण्याचा सल्ला देतात. मात्र आता प्रश्न असा पडतो की ज्यांचे कोलेस्ट्रॉल आधीच वाढलेले आहे त्यांनी अंडी खाल्ल्यास परत कोलेस्ट्रॉल वाढतं का? आणि वाढत असेल तर किती प्रमाणात अंडी खायला हवी. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

अंडी खाल्ल्यानं खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?

अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की अंड्यांमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, या प्रकारचे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात निरोगी पेशी तयार करते. यामध्ये सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅट नसल्यामुळे एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. मात्र अंडी उकळलेलीच खावी, जास्त तेलात किंवा बटरमध्ये अंडी शिजवून खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसान होईल.

अंडी किती प्रमाणात खावी?

अंडी खाल्ल्याने शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढते, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांपासूनही आपले संरक्षण होते. डायटीशियन आयुषी यादव यांच्या मते, जर तुम्ही दिवसातून 2 अंडी खाल्ली तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यापेक्षा जास्त सेवन करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे लोक हेवी वर्कआउट करतात त्यांनी मात्र जास्त अंडी खाणे आवश्यक आहे.

कोलेस्ट्रॉल कशाने वाढते?

आपण आपल्या दैनंदिन जीवनात असे काही खाद्यपदार्थ खातो, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते.

1. रेड मीट - रेड मीट प्रोटीनचा उत्तम सोर्स असेल तरी त्यात चरबी देखील मुबलक प्रमाणात आढळते, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खा.

2. फुल फॅट दूध - दूध आरोग्यासाठी फार चांगले असते. जर तुम्ही फुल फॅट दूध प्यायले तर कोलेस्ट्रॉल वाढू शकते, त्यामुळे तुम्ही क्रीम काढून त्या दूधाचे सेवन करावे.

3. तेलकट पदार्थ - बऱ्याच प्रकारचे तेल हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. तेव्हा याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Flood: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! मिठी नदीत तरूण वाहून जाताना व्हिडिओ समोर तर एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Donald Trump: अमेरिकेत ट्रम्प यांचा थेट कारवाईचा निर्णय; रोजगार आकडेवारीवरून बीएलएस प्रमुखांना दिली हकालपट्टी

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : उजनीतून भीमा नदीत 11हजार 600 क्युसेक विसर्ग

PM Modi on Indus Water Treaty : 'सिंधू जल करार'वरून नेहरूंचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र, म्हणाले...

सुदर्शन विरुद्ध राधाकृष्णन! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर, कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?

SCROLL FOR NEXT