Mayonnaise sakal
आरोग्य

Mayonnaise: मेयोनीज खाणं पडू शकतं महागात; वेळीच सावध व्हा, नाहीतर..

जेव्हा फिटनेसचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक लोक फास्ट फूड टाळण्याचा प्रयत्न करतात

Aishwarya Musale

जेव्हा आपण फिटनेसचा विचार करतो, तेव्हा आपण फास्ट फूड टाळण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हला मेयोनीजबद्दल माहित आहे का? होय, तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मेयोनीज खाणं आरोग्यदायी आहे की नाही ? मेयोनीज कसे बनवले जाते आणि ते आरोग्यदायी आहे की नाही हे आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत.

मेयोनीज म्हणजे काय?

मेयोनीज हा एक पांढरा सॉस आहे. यामध्ये अंडी, तेल, व्हिनेगर, मीठ आणि साखर या सर्वांचा वापर केला जातो. मेयोनीज तेलापासून बनविलेले आहे आणि तेलात अंडी आणि व्हिनेगर असते. त्यानंतर मसाला घालून शेवटी तो मिक्स केला जातो. पांढऱ्या साखरेचा मेयोनीजमध्ये वापर केला जातो ज्याला ‘हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप’ चा एक प्रकार म्हणून देखील ओळखले जाते.

यामुळे शरीराचे नुकसान देखील होते, यामुळे तुमची साखर आणि रक्तदाब वाढू शकते. याशिवाय, मेयोनीजमध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅलरी जास्त प्रमाणात असतात जे हाडे, हृदय आणि शरीराच्या इतर भागांसाठी हानिकारक असतात. हे एक प्रक्रिया केलेले सॉस आहे, जे फास्ट फूडमध्ये जास्त वापरले जाते.

मेयोनीज खाण्याचे तोटे-

रक्तातील साखरेची पातळी वाढते –

जास्त मेयोनीज खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. तसेच जर तुम्ही मेयोनीजचा वापर मर्यादित प्रमाणात केला तर तुमच्या शरीराला त्रास होत नाही. त्याचबरोबर मेयोनीजच्या अतिसेवनामुळे साखरेची पातळी झपाट्याने वाढते. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर यामुळे तुमची समस्या वाढू शकते.

यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा -6 फॅटी ॲसिड असतात जे शरीरासाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे मेयोनीजचे अधिक सेवन करणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT